scorecardresearch

गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

दिग्दर्शक रवी जाधव ‘चारचौघी’ नाटकाविषयी काय म्हणाले?

taali web series team watched charchaughi drama
दिग्दर्शक रवी जाधव 'चारचौघी' नाटकाविषयी काय म्हणाले? (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर असे तगडे कलाकार मंडळी असलेले ‘चारचौघी’ नाटक रसिक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. रंगभूमीवर हे नाटक जोरदार सुरू आहे. नुकताच या नाटकाचा २२२वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला ‘ताली’ वेब सीरिजच्या टीमनं हजेरी लावली होती. यासंबंधित नुकतीच ‘ताली’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या कलाकृतीचा शुभारंभ

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

रवी जाधव यांनी ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमबरोबरचा फोटो शेअर केला आहे. आणि लिहीलं आहे की, “काल आमच्या ‘ताली’ टिम मधील श्रीगौरी सावंत, क्षितीज पटवर्धन, नंदु माधव यांच्याबरोबर ‘चारचौघी’ या नाटकाचा २२२वा हाऊसफुल प्रयोग पाहिला. अत्यंत ताकदीचं नाटक. प्रत्येक बाबतीत…लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य सर्व काही अप्रतिम…असं क्वचितच होतं…”

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो

“पण प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रत्येक कलाकार जेव्हा समरसून काम करुन आपले १०० टक्क्यांहून जास्त योगदान देतो तेव्हाच अशी जबरदस्त कलाकृती जन्माला येते. नाटकाबद्दल जास्त डिटेल्स लिहीत नाही. कारण ‘चारचौघी’ हे नाटक माझ्यासारख्याची प्रतिक्रिया वाचण्याचे नाही तर प्रत्यक्ष पाहून अनुभवायचे नाटक आहे. हॅट्स ऑफ टीम चारचौघी,” असं रवी जाधव यांनी लिहीलं आहे.

हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, ‘चारचौघी’ या मूळ नाटकाचा पहिला प्रयोग मराठी रंगभूमीवर १९९१ रोजी सादर झाला होता. यामध्ये दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taali web series team watched charchaughi drama with gauri sawant ravi jadhav says pps

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×