The Traitors Fame Tanya Puri Shocking Revelation: करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या बहुचर्चित शोमध्ये सहभागी झालेली महिला गुप्तहेर तान्या पुरी हिने एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अत्यंत गोंडस आणि ‘क्यूट’ इमेज असलेली एक लोकप्रिय अभिनेत्री सध्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवून पैसे कमावत असल्याचा खुलासा तान्याने केला आहे. विशेष म्हणजे, या कामात तिचा बॉयफ्रेंडही सहभागी असून तोच तिच्या या कामाला प्रोत्साहन देतो, असे तान्याने उघड केले आहे.
तान्या पुरीच्या मते, ती अभिनेत्री ही सगळी कामे एका हॉटेलमधून करते. जाहरा जानीला दिलेल्या मुलाखतीत तान्याने सांगितलं की, अभिनेत्रीने याच कामातून खूप पैसा कमावला आहे. मात्र, अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा तिने केला नाही.
ती हॉटेल्समध्ये पुरुषांना भेटते आणि पैसे कमावते -तान्या पुरी
तान्या पुरी म्हणाली, “ही अभिनेत्री आधी चित्रपटांमध्ये काम करायची आणि आता जास्त चित्रपट करत नाही. पण इतक्या वर्षांत तिने बराच पैसा कमावलाय आणि चांगले कॉन्टॅक्ट्स बनवले आहेत. लोक तिला फक्त सोशल इव्हेंट्समध्येच पाहतात. प्रत्यक्षात मात्र पडद्यामागे ती हॉटेलच्या खोल्यांमध्ये जाते, पुरुषांना भेटते, त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवते आणि पैसे कमावते.”

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बॉयफ्रेंडला काहीच अडचण नाही – तान्या पुरी
तान्या पुरी पुढे म्हणाली, “ती फक्त नवीन स्टोअर्सचे उद्घाटन करणारी किंवा इव्हेंट्समध्ये दिसणारी अभिनेत्री नाही. तिची एक टीम आहे जी तिच्या पडद्यामागच्या या सगळ्या गोष्टी बघते. खरं तर ती ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्याला तिच्याबद्दल सगळं माहीत आहे. तो तिच्या टीमचाच एक भाग आहे. ती अशा पार्टनरसोबत आहे जो या सर्व गोष्टींसाठी तिला प्रोत्साहन देतो. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला इतरांबरोबर शेअर करण्यात कोणतीही अडचण नाही.”
त्या अभिनेत्रीबद्दल समजलं तर लोकांचा विश्वास उडेल – तान्या पुरी
तान्या पुरी म्हणाली, “लोकांसमोर तर ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आधी इंडस्ट्रीत खूप काम केलंय, तिचं नाव आहे. पण पडद्यामागे ती हे सगळं करत आहे. मला वाटतं की जर तिचं नाव समजलं, तर लोकांचा निरागसतेवरून विश्वासच उडेल. कारण लोकांना वाटेल की, ‘अरे, मला तर वाटलं होतं की ती एक साधी मुलगी आहे. तिची तर खूप क्यूट इमेज होती, तीसुद्धा अशी असू शकते का?’ त्यामुळे तिचं नाव बाहेर आल्यास तिच्या इमेजला मोठा धक्का बसेल.”
