Netflix Trending Series : इमरान हाश्मी आणि नीरज पांडे यांच्या ‘तस्करी’ या वेब सीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. ही सीरिज केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापारही लोकप्रिय होत आहे. या सीरिजने २० वेगवेगळ्या देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १० नॉन-इंग्लिश शो’ यादीत स्थान मिळवले आहे. इतक्या कमी वेळात जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकणे ही भारतीय सीरिजसाठी मोठी कामगिरी आहे.
इमरान हाश्मी सध्या ओटीटीचा किंग ठरत आहे. कारण नेटफ्लिक्सवर आधी त्याचा ‘हक’ चित्रपट रिलीज झाला. जो ट्रेंडिंग होता. त्यानंतर त्याची ‘तस्कारी: द स्मगलर्स वेब’ सीरिज आली. सिनेमा व सीरिजला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
नीरज पांडे दिग्दर्शित ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ने जागतिक स्तरावर कामगिरी केली आहे. ही सीरिज जगभरातील २० देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप १० नॉन इंग्लिश शोच्या लिस्टमध्ये ट्रेंडिंग आहे. यापैकी १० देशांमध्ये ती पहिल्या क्रमांकावर राहिली. यातून या सीरिजची लोकप्रियता दिसून येते.
सीरिजला मिळाले ५०.६ मिलियन व्ह्यूज
व्ह्यूअरशिपच्या बाबतीत ‘तस्करी’ने विक्रमच रचला आहे. फक्त १२ दिवसांत या सीरिजने अनेक रेकॉर्ड मोडले. या सीरिजला ५ कोटी ६ लाख म्हणजेच तब्बल ५०.६ मिलियन व्ह्यूज मिळाले. इम्रान हाश्मीची ही सीरिज प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतेय.
नेटफ्लिक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार १९ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान या शोला चांगले व्ह्यूज मिळाले. ‘तस्करी’ ला या आठवड्यात ३.९ मिलियन व्ह्यूज व २१.२ मिलियन तास वॉचटाइम मिळाला. ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉपल १० नॉन इंग्लिश शोच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सध्या या यादील साउथ कोरियन रोमँटिक कॉमेडी ‘कॅन धिस लव्ह बी ट्रान्सलेटेड?’ पहिल्या क्रमांकावर आहे.
तुलना करायची झाल्यास २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘ब्लॅक वॉरंट’ सीरिजला एकूण ९.८ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. याउलट, इमरान हाश्मीच्या ‘तस्करी’ ने फक्त दीड आठवड्यात ९.३ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला होता. ही सीरिज ज्या वेगाने व्ह्यूजचे रेकॉर्ड मोडतेय ते पाहता ती नवे विक्रम रचेल, असं दिसतंय.
७ भागांची ही स्मगलिंग सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. ती नीरज पांडे आणि राघव जयरथ यांनी सह-दिग्दर्शित केली आहे. सीरिजची कथाच नाही तर इमरान हाश्मीच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. इमरानबरोबर शरद केळकर, नंदीश सिंग संधू आणि अमृता खानविलकर सारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या सीरिजला IMDb रेटिंग ७.२ मिळाले आहे.

