Teachers Day special movies on OTT: आई-वडिलांनंतर मुलांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान असते. शिक्षक मुलांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात. गुरु आणि शिष्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यावर अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाले आहेत. या यादीत ‘तारे जमीन पर’, ‘श्रीकांत’ सारखे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याचे आयुष्य कसे बदलले हे पाहायला मिळतं.
तारे जमीन पर (Taare Zameen Par)
‘तारे जमीन पर’ या चित्रपटात ईशान नावाच्या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ईशानला डिस्लेक्सिया नावाचा आजार असतो. त्यानंतर ईशान शिक्षक रामशंकर निकुंभला भेटतो, जो त्याचे वाचन आणि लेखन कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात ईशानची भूमिका दर्शील सफारीने केली आहे, तर त्याच्या शिक्षकाची भूमिका आमिर खानने केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे? OTT वरील ‘हे’ फॅमिली शो नक्की पाहा
श्रीकांत (Srikanth)
या वर्षी प्रदर्शित झालेला राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट नेत्रहीन बिझनेसमन श्रीकांत बोल्लाच्या जीवनावर आधारित आहे. राजकुमारने श्रीकांत बोल्लाची भूमिका साकारली होती. श्रीकांतला शिक्षणापासून ते प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागतो. या संघर्षात त्याची शिक्षिका त्याला मदत करते, ती त्याची साथ सोडत नाही. यात ज्योतिका श्रीकांतच्या शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
हिचकी (Hichki)
‘हिचकी’ हा एक मनाला स्पर्शून जाणारा हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये राणी मुखर्जी टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. ती आपल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी किती मदत करते ते या चित्रपटात पाहयला मिळतं. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
सुपर 30 (Super 30)
‘सुपर 30’ हा हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्याने आनंद कुमार नावाचे पात्र साकारले आहे. तो मुलांना आयआयटी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कशी मेहनत घेतो ते या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.
एमएस धोनी (MS Dhoni)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट धोनीचा बायोपिक आहे. या चित्रपटातही त्याच्या शिक्षकांनी धोनीतील क्रिकेटचे कौशल्य कसे ओळखले आणि त्याला खेळण्याची संधी दिली हे पाहायला मिळतं. हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.