‘द फॅमिली मॅन’ ही भारतातील लोकप्रिय वेब सीरिज आहे. चार वर्षांनी या सीरिजचा तिसरा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ आज शुक्रवारी (२१ नोव्हेंबरला) रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये पुन्हा एकदा मनोज बाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत परतला आहे.

तुम्ही ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचे चाहते असाल तर ही सीरिज कुठे पाहायची ते जाणून घ्या. ‘द फॅमिली मॅन ३’ मागील दोन सीझनप्रमाणे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. प्राइम व्हिडीओने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘द फॅमिली मॅन ३’ चे नवीन पोस्टर रिलीज केले. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “ब्रेकिंग न्यूज द फॅमिली मॅन आला आहे. द फॅमिली मॅन चा नवीन सीझन प्राइमवर आहे.”

’द फॅमिली मॅन 3’मध्ये किती एपिसोड आहेत?

’द फॅमिली मॅन 3’ च्या चाहत्यांना या सीरिजच्या एपिसोडबद्दल प्रश्न पडले आहेत. तर या तिसऱ्या सीझनमध्ये सात एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड ४० ते ५० मिनिटांचा आहे.

Award Banner

’द फॅमिली मॅन 3’मधील कलाकार

’द फॅमिली मॅन 3’मध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहे. तसेच प्रियामणी, शारिब हाशमी, श्रेया धन्वंतरी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा व दलीप ताहिल या सिनेमात आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये काही नवीन कलाकार आले आहेत. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे ‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावत. त्यांनी ‘रुकमा’ व निम्रत कौरने ‘मीरा’ नावाची भूमिका केली आहे.

द फॅमिली मॅन 3 ट्रेलर

आधीच्या दोन सीझनप्रमाणचे याही सीझनमध्ये श्रीकांत तिवारीसमोर मोठा धोका असेल. या नवीन सीझनमध्ये श्रीकांतची अधिकारी, पती आणि वडील या प्रत्येक भूमिकेत परीक्षा घेतली जाईल. ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शन राज अँड डीके, सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनी केले आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या सीरिजचे निर्माते आहेत आणि त्यांनी तिन्ही सीझनची निर्मिती केली आहे.