Prime Video Trending Movies: प्राइम व्हिडीओ भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवे शो, चित्रपट, वेब सीरिज रिलीज होतात. २०२५ चा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यात ओटीटीवर अनेक कलाकृती रिलीज होणार आहेत. पण आधीच रिलीज झालेल्या काही सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

या महिन्यात, अनेक बहुप्रतिक्षित सीरिज आणि चित्रपट प्राइम व्हिडीओवर येतील. पण आज आम्ही तुम्हाला प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग असलेल्या टॉप 5 सीरिज व चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही ते अद्याप पाहिले नसतील, तर फावल्या वेळेत किंवा वीकेंडला पाहू शकता.

द फॅमिली मॅन ३

मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्या द फॅमिली मॅन ३ ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या लोकप्रिय मालिकेचा तिसरा सीझन २१ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर लगेचच, या सीरिजने टॉप १० मध्ये स्थान मिळवलं. द फॅमिली मॅन सीझन ३ ला IMDb वर ७.४ रेटिंग मिळाले आहे.

Award Banner

कांतारा

प्राइम व्हिडीओर कांतारा टॉप २मध्ये आहे. हिंदी भाषेतील कांताराला ओटीटीवर प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. कांताराला ८.१ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही कांतारा पाहिला नसेल तर ओटीटीवर पाहू शकता.

डिजल

ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर डिजल चित्रपट ट्रेंडिंग आहे. या सिनेमाची दमदार कथा व कलाकारांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पाहा.

टू मच विद काजोल अँड ट्विंकल

काजोल व ट्विंकल खन्ना यांचा प्राइम व्हिडीओवरील शो चर्चेत आहे. कारण या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा टॉक शो प्राइम व्हिडीओवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. तुम्ही या शोमध्ये विविध पाहुण्यांचे एपिसोड पाहू शकता.

कांतारा: अ लीजेंड- चॅप्टर 1

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर कांतारा: अ लीजेंड- चॅप्टर 1 ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. प्राइम व्हिडीओवरील टॉप 5 च्या यादीत अलीकडेच रिलीज झालेला कांतारा: अ लीजेंड- चॅप्टर 1 आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटर्समध्ये पाहिला नसेल तर ओटीटीवर नक्की पाहा.