Watch These Films & Series On Ott : दर महिन्याला वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट व सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत असतात, त्यामुळे येणाऱ्या नवीन महिन्यात कोणत्या कलाकृती पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते; म्हणून आम्ही तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात कोणते चित्रपट व सीरिज प्रदर्शित होणार आहेत याबद्दल सांगणार आहोत.

गुस्ताख इश्क – विजय वर्मा, फातिमा सना शेख, नसीरुद्दीन शाह आणि शारिब हाशमा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला, पण त्यावेळी प्रेक्षकांमध्ये ‘धुरंधर’ची क्रेझ असल्याने त्याचा फटका या चित्रपटाला बसला असं म्हटलं जातं. अशातच आता ओटीटीवर हा चित्रपट २७ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

सर्वम माया – हा एक हॉरर चित्रपट आहे. प्रिया प्रकाश वॉरियर, प्रीती मुखुंधन, रिया शिबू हे कालाकार यामध्ये पाहायला मिळतात. हा एक तामिळ चित्रपट असून याची कथा एका नास्तिक मुलाभोवती फिरते, ज्याची भेट पुढे भूताबरोबर होते आणि तिथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. हा खूप मजेशीर चित्रपट आहे, तो ३० जानेवारीला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

वा वथियार – हा एक ॲक्शन-कॉमेडी तामिळ चित्रपट आहे. यात जिथे कार्थी, राजकिरण, सत्यराज, आनंदराज करुणाकररण, शिल्पा मंजुनाथ हे कलाकार आहेत. हा चित्रपट २८ जानेवारी रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

द ५० – हा एक रिॲलिटी शो आहे. तो १ फेब्रुवारीपासून जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. यामध्ये अनेक टेलिव्हिजनवरील कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पाहायला मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून या शोची चर्चा सुरू आहे.

किस किस को प्यार करू २ – कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाल नाही. आता ६ फेब्रुवारीला हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

द राजासाब – या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला. पण, जर थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट तुम्हाला पाहता आला नसेल तर तुम्ही घरबसल्या पाहू शकता. १३ फेब्रुवारीला हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.