OTT This Week Releases: ओटीटी प्रेमींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, झी ५ यांसह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. त्यामुळे घर बसल्या नवीन कलाकृती पाहण्याचं नियोजन करत असाल, तर या आठवड्यात कोणते सिनेमे आणि सीरिज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्या तारखेला रिलीज होणार आहेत, जाणून घेऊया

फौदा सीजन ५ – ही सायकॉलॉजिकल पॉलिटिकल थ्रिलर सीरिज असून, ‘फौदा’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थरार आणि राजकीय घडामोडींनी भरलेली ही सीरिज ओटीटीवर चांगलीच रंगत आणणार आहे. नेटफ्लिक्सवर ८ सप्टेंबरपासून ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

चुंबक – ही एक सीरिज असून, यात नीना गुप्ता, देवेन भोजानी, सुमीत व्यास, अर्जुन बिजलानी, मानसी पारेख आणि हेली शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘चुंबक कॉलोनी’त राहणाऱ्या पाच विचित्र आणि एकमेकांशी जोडलेल्या कुटुंबांची ही मजेशीर कहाणी आहे. शेजाऱ्यांमधील नोकझोक, कौटुंबिक नाती आणि रोजच्या आयुष्यातील गमतीजमती या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत.१० सप्टेंबरपासू नटेफ्ल्किसवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

घमासान – ‘घमासान’ एक क्राइम ड्रामा चित्रपट आहे ज्याचं दिग्दर्शन तिग्मांशु धूलिया यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि अरशद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट झी ५वर ११ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

अली बाबा और चालीस भूत – ही हॉरर-कॉमेडी आणि वेब सीरिज असून, लोकप्रिय ‘अली बाबा और चालीस चोर’ या कथेला एका थरारक आणि भयावह अंदाजात सादर करण्यात आलं आहे. यात आशा नेगी आणि विशाल वशिष्ठ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जिओ हॉटस्टारवर ११ सप्टेंबरला ही सीरिज रिलीज होणार आहे.

प्रिंस ऑफ मॉलीवुड – ही एक मल्याळम कॉमेडी सीरिज आहे. या सीरिजची कथा फिरोज नावाच्या तरुणाभोवती फिरते, ज्याचं प्रसिद्ध अभिनेता बनण्याचं स्वप्न आहे. मात्र, त्याच्या या स्वप्नाच्या आड त्याचेच करोडपती वडील उभे आहेत. फिरोज आपल्या स्वप्नासाठी कसा संघर्ष करतो, हे पाहायला मिळणार आहे. ११ सप्टेंबरला जिओ हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होत आहे.

चिकू और बंटी: कुश्ती की जंग – ही लहान मुलांसाठी खास अॅनिमेटेड फिल्म आहे. ‘चिकू और बंटी: कुश्ती की जंग’मध्ये चिकूच्या बॉक्सिंगच्या अहंकाराला ‘वीरा’ नावाचा धोकादायक कुस्ती चॅम्पियन आव्हान देतो. यानंतर चिकू आणि बंटी मिळून त्याच्या चुकीच्या खेळाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतात. जिओ हॉटस्टारवर १३ सप्टेंबरपासून हा चित्रपट रिलीज होत आहे.

द रिव्होल्युशनरीज – ‘मुंबई डायरीज’ आणि ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’चे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांची ही सीरिज आहे. संजीव सन्याल यांच्या Revolutionaries: The Other Story of How India Won Its Freedom या पुस्तकावर आधारित या सीरिजमध्ये ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या चार तरुण क्रांतिकारकांची कथा पाहायला मिळणार आहे. भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरजादा प्रमुख भूमिकेत असून, जेसन शाह, पाओली दाम आणि तोता रॉय चौधरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ११ सप्टेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज होत आहे.