Trending Horror movie on OTT: ओटीटीवर जगभरातील कंटेंट तम्हाला तुमच्या फोनवर पाहायला मिळतो. अलीकडचा ट्रेंड पाहिल्यास प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपट आणि सीरिजबद्दल सर्वात जास्त क्रेझ आहे. निर्मातेही मोठ्या प्रमाणात सस्पेन्स व थ्रिलर हॉरर चित्रपटांची निर्मिती करत आहेत. कारण ओटीटीवर लोक सहसा या जॉनरमधील चित्रपटांना जास्त पसंती देत आहेत.
आज आम्ही तुम्हाला १ तास ४२ मिनिटांच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ओटीटी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. या चित्रपटाचं नाव काय, त्याची कथा व तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल हे जाणून घेऊयात.
आपण ज्या चित्रपटाचा बोलत आहोत तो नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार दोन्हीवर उपलब्ध आहे. त्याचे नाव ‘द ट्रेन ऑफ डेथ’ आहे. हा इंडोनेशियन हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. हा भयानक चित्रपट पाहताना तुम्हाला भीती वाटेल. ही कथा पूर्णिमाभोवती फिरते, जी कर्करोगातून बरे झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या भावाबरोबर एका ट्रेन प्रवासाला निघते. पण प्रत्येक बोगद्यानंतर ट्रेनचे डबे रहस्यमयीरित्या गायब होतात आणि त्यांचा प्रवास रक्तरंजित होतो.
ओटीटीवर ट्रेंडिंग आहे ‘द ट्रेन ऑफ डेथ’
हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर ट्रेंडिंग आहे. ‘द ट्रेन ऑफ डेथ’ हा चित्रपट ९ व्या क्रमांकावर आहे. या लोकांना चित्रपटातील सस्पेन्सफुल कंटेंट खूप आवडला आहे. हिंदी प्रेक्षकही त्याचे कौतुक करत आहेत. चित्रपटाचं नाव वाचूनच तो एक सर्व्हायवल हॉरर चित्रपट असल्याचं स्पष्ट होतं. यात अचानक रेल्वे प्रवाशांचे जीव धोक्यात येतात, ते दाखवलं आहे. हा हॉरर सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
तुम्हाला भयपटांची भीती वाटत असेल आणि रात्री घरी एकटे असाल तर हा चित्रपट पाहण्याची चूक अजिबात करू नका. हा चित्रपट पाहताना तुम्हाला खूप भीती वाटेल, त्यामुळे तुमची झोप उडू शकते. तुम्ही वीकेंडला किंवा वेळ मिळेल तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकता. पण हा चित्रपट पाहताना सोबत कुणीतरी असेल याची खात्री करा.

