South Thriller Film On OTT: अलीकडच्या काळात लोकांमध्ये ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज, मालिका पाहण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे बरेचदा चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रसारित केले जातात. दक्षिणेकडील चित्रपटांची भारतात एक वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. लोकांना ‘पुष्पा २’, ‘एम्पुरन’ सारखे चित्रपट आवडत आहेत आणि तेथील चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहेत. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये केवळ कथा आणि दमदार अभिनयच नसतो तर नाही तर अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलरचा पूर्ण मिलाफ पाहायला मिळतो, ज्यामुळे तेथील चित्रपट लोकांना आकर्षित करतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्याळम चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा २ तास ३५ मिनिटांचा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. या चित्रपटाचे नाव काय आहे आणि तो कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल ते जाणून घेऊयात.

चित्रपटाचे नाव काय आहे?

या चित्रपटाचे नाव आहे ‘ट्रान्स’ (Trance). २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार फहाद फासिल मुख्य भूमिकेत होता. तसेच अनवर रशीद, अर्जुन अशोकन, सौबिन, वासुदेव मेनन, चेम्बन विनोद जोस व विनायकनसह अनेक कलाकार आहेत. फहादची पत्नी नजरिया नझीमही या सिनेमात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनवर रशीद यांनी केलं आहे. या सुपरहिट चित्रपटाची कथा जाणून घेऊयात.

‘ट्रान्स’ चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटाची कथा जाणून घेऊयात. ‘ट्रान्स’मध्ये विजू प्रसाद (फहाद फासिल) नावाचा एक मोटिव्हेशनल स्पीकर असतो, तो त्याच्या भावाबरोबर राहतो आणि पैसे कमावण्यासाठी हॉटेल्समध्ये पार्ट टाइम काम करतो. याचदरम्यान, त्याचा भाऊ आत्महत्या करतो. भावाच्या जाण्याच्या धक्क्याने विजू नैराश्यात जातो आणि मग सगळं सोडून मुंबईला निघून जातो.

या चित्रपटाची कथा अगदी साधी वाटतेय, त्यामुळे त्यात काय खास आहे असा विचार तुम्ही करत असाल. तर, हा चित्रपट सुरू झाल्यावर थोड्याच वेळात यात खूप सारे रंजक ट्विस्ट येतात. त्यानंतर प्रेक्षकांना विजू प्रसादचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. विजू पादरी जोशुआ होतो आणि त्याला लोक आपलं सर्वस्व समजू लागतात. यानंतर टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी उलगडत जातात, ते पाहून तुम्हाला धक्के बसल्याशिवाय राहणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा चित्रपट?

‘ट्रान्स’ चित्रपट कुठे पाहायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे प्राइम व्हिडीओ. तुम्हाला प्राइम व्हिडीओ या ओटीटीट प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहता येईल. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे.