नेटफ्लिक्सवर थरार आणि हाईस्ट (चोरीच्या) चित्रपटांचा संग्रह आहे, हे चित्रपट नाट्यमय घटना, चतुर योजना, आणि चकित करणाऱ्या ट्विस्टने भरलेले आहेत. चोरीची कथा असलेले हे चित्रपट मानवी महत्त्वाकांक्षा, फसवणूक, आणि संपत्ती व सत्तेसाठी माणूस किती दूर जाऊ शकतो, हे दाखवतात. हे पाच चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवणाऱ्या हाईस्टच्या जगात थरारक अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जातील.

चोर निकल के भागा

Chor Nikal Ke Bhaga On Netflix : हा चित्रपट एक खिळवून ठेवणारा हाईस्ट चित्रपट आहे, ज्यात एक एअर होस्टेस (यामी गौतम) आणि एक कॉनमॅन (सनी कौशल) मिळून एका कमर्शियल फ्लाइटमध्ये हिर्‍यांची चोरी करण्याचा प्लॅन करतात. मात्र, त्यांचा प्लॅन विमानात अनपेक्षित वळण घेतो आणि त्यांना चोरी केलेले हिरे घेऊन सुटण्यासाठी संघर्ष करावा लागतो. थरार, फसवणूक, आणि धाडसी कृतीने भरलेला हा चित्रपट हाईस्ट शैलीत एक नवा दृष्टिकोन देतो.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”

हेही वाचा…‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल

प्लेयर्स

Players On Netflix : ‘प्लेयर्स’ हा ‘द इटालियन जॉब’ या सिनेमाच्या थीमवर आधारित आहे, ज्याला एक परिपूर्ण बॉलीवूड ट्विस्ट देण्यात आला आहे. हा चित्रपट अ‍ॅक्शन, थ्रिल आणि हाय-टेक चोऱ्यांनी भरलेला आहे. यात एक कुशल चोरांची टीम दाखवण्यात आली आहे, या टीमचे नेतृत्व अभिषेक बच्चन आणि बिपाशा बासू करतात. या सिनेमात सोन्याची बिस्कीट चोरण्याचा प्लॅन असतो. गुन्हेगारीच्या जगातील अचूकता, वेळेचे महत्त्व, ड्रामाने भरलेला हा चित्रपट तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतो. सतत येणाऱ्या ट्विस्ट आणि फसवणुकीमुळे या चोरीच्या कथेला एक वेगळाच थरारक अनुभव मिळतो.

डॉन २

Don 2 On Netflix : ‘डॉन २’ मध्ये शाहरुख खानचे आयकॉनिक पात्र दाखवण्यात आले आहे. जागतिक गुन्हेगारीचे मास्टरमाईंड डॉन एक भव्य चोरीचा प्लॅन आखतो. शाहरुख खानचा जबरदस्त अभिनय खिळवून ठेवणारी चोरीची कथा यामुळे हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत अंदाज लावायला लावतो.

हेही वाचा…Yo Yo Honey Singh Famous: हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा

हॅप्पी न्यू ईयर

Happy New Year On Netflix : हाईस्ट चित्रपट मजेदारही असू शकतो, हे ‘हॅप्पी न्यू ईयर’ सिद्ध करतो. शाहरुख खान एका विचित्र लोकांच्या गटाचे नेतृत्व करतो, या टीमला घेऊन शाहरुख खानचे पात्र दुबईतील एका प्रतिष्ठित डान्स स्पर्धेदरम्यान हिर्‍यांची चोरी करण्याची योजना आखते. पण, ही चोरी फक्त संपत्ती मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटामध्ये अनोखे प्रसंग, भावनिक कथानक, आहेत. कॉमेडी आणि थराराचा उत्तम मिलाफ असलेल्या या चित्रपटाने हाईस्ट शैलीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा…Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला…

सिकंदर का मुकद्दर

Sikandar Ka Muqaddar On Netflix : ‘सिकंदर का मुकद्दर’ ही सिकंदर (अविनाश तिवारी) ची कथा सांगते, जो ज्वेलरी प्रदर्शनात हिर्‍यांची चोरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली अडकतो आणि त्यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. यात सिनेमात हिरे नक्की कोण चोरी करत हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.

Story img Loader