Top 10 OTT shows: ओटीटीवर जशा वेब सीरिज, चित्रपट, डॉक्युमेंटरी पाहता येतात, तसेच टीव्ही शोदेखील पाहता येतात. प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार विविध कंटेंट पाहत असतात. प्रेक्षकांच्या पसंतीनुसार शोचे ट्रेंडिंग लिस्टमधील स्थान बदलते. दर आठवड्याला या यादीत बदल होत असतात. आता ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट यादरम्यान ओटीटीवर पहिल्या दहा स्थानांवर कोणते रिअॅलिटी शो, मालिका, वेब सीरिज, चित्रपट आहेत याबद्दल जाणून घेऊ…
खतरों के खिलाडी
ओरमॅक्स स्ट्रीमव्ह्यू (Ormax StreamView)च्या यादीत पहिल्या स्थानावर खतरों के खिलाडी हा शो आहे. या शोचा पंधरावा सीझन सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. ३ ते ९ ऑगस्ट या दरम्यान हा शो जवळजवळ ५.८ मिलियन प्रेक्षकांनी पाहिला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय विनोदी मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. नुकतीच या शोला १८ वर्षे पूर्ण झाली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील कलाकार एकत्र आले होते. ही मालिका गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे.
मुसाफिर कॅफे
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे.
लॉक अप
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘लॉक अप’ हा शो टॉप चारमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी हा शो संपला आहे. श्रेया कालरा या शोची विजेती झाली.
इंडियाज गॉट लेटेंट
इंडियाज गॉट लेटेंट हा शो पाचव्या क्रमांकावर आहे. समय रैनाचा शो काही दिवसांपूर्वी पहिल्या क्रमांकावर होता, आता मात्र हा शो पाचव्या स्थानावर आहे.
सहाव्या स्थानावर ‘ठुकरा के मेरा प्यार सीझन २’, सातव्या स्थानावर ‘ऑपरेशन सफेद सागर’ हा शो आहे. आठव्या स्थानावर ‘अनुपमा’, नवव्या स्थानावर ‘द ताज स्टोरी’, दहाव्या स्थानावर ‘उयिर’ हा शो आहे.
दरम्यान, आता पुढच्या आठवड्यात या यादीत बदल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
