Top 10 OTT Shows This Week: ‘विश्वनाथ अँड सन्स’ ते ‘अलीबाबा और ४० भूत’; ओटीटीवर कोणत्या शो आणि सिनेमांनी मारली बाजी? समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटला मिळाले ‘इतके’ व्ह्युज

ओटीटीवर अनेक रिअॅलिटी शो, अनेक सिनेमे दर आठवड्याला प्रदर्शित होतात. त्यातील काही शो, सिनेमे ट्रेंड होत असतात. आता या आठवड्यात पहिल्या १० मध्ये कोणते सिनेमे आणि रिअॅलिटी शो आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

बिग बॉस २०

बिग बॉस २० हा रिअॅलिटी शो ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या शोला १६.८ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. प्रेक्षक या शोला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. सलमान खानच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा शो जिओ हॉटस्टारवर पाहता येतो.

इंडियाज गॉट लेटेंट २

समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटंट २’ हा शो सतत चर्चेत असतो. या शोला ५.९ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. यूट्यूब आणि नेटफ्लिक्सवर हा शो पाहता येतो.

खतरों के खिलाडी १५

‘खतरों के खिलाडी १५’ या शोला ५.४ दशलक्ष व्ह्युज मिळाले. हा शो जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होतो. त्या शोचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करतो.

कौन बनेगा करोडपती १८

अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोला ४.८ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. तुम्ही हा शो सोनी लिव्हवर पाहू शकता.

तारक मेहता का उल्टा चश्मा

तारक मेहता का उल्टा चश्मा या शोला ४.५ दशलक्ष व्ह्युज मिळाले. हा शो यूट्यूब आणि सोनी लिव्हवर पाहता येतो.

बिग बॉस तेलुगू १०

बिग बॉस तेलुगू १० जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होतो. त्याला ४.३ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत.

विश्वनाथ अँड सन्स

हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला ४.२ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. अभिनेता सूर्या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

बिग बॉस तमीळ १०

या शोला ३.९ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. हा शो जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होतो.

अलीबाबा और ४० भूत

अलीबाबा और ४० भूतला ३.५ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. जिओ हॉटस्टावर ही सीरिज पाहता येते.

द रिव्हॉल्युशनरी

द रिव्हॉल्युशनरी ही सीरिज अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला ३ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत.