Watch these Five Thriller Movies On Netflix : हल्ली ओटीटी हे अनेकांच्या सोयीचं आणि आवडीचं माध्यम ठरत आहे. बाहेर कुठेही न जाता घरबसल्या विविध विषयांवर आधारित चित्रपट आणि सीरिज फोन, टॅबवर पाहायला मिळतात. त्यातही थ्रिलर, रहस्यमय, क्राइम या जॉनरच्या चित्रपटांची क्रेझ अधिक आहे. जर तुम्हालासुद्धा अशा जॉनरचे चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे तुम्ही पाहायलाच हवे.

आम्ही तुम्हाला अशा काही थ्रिलर चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. ज्यामध्ये भावना, विज्ञान आणि गुन्हा यांचा समावेश आहे. करीना कपूर ते राजकुमार राव सारख्या काही कलाकारांच्या थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात…

नेटफ्लिक्सवर पाहा ‘हे’ ५ थ्रिलर चित्रपट

मोनिका ओह माय डार्लिंग – राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेली ही हाय-टेक जगात रचलेली भयंकर गोष्ट आहे. विवाहबह्यसंबंध आणि ब्लॅक मेलिंगमध्ये अडकल्यानंतर एका यशस्वी रोबोटिक्स अभियंताच्या आयुष्यात कसे चढ-उतार येतात हे यामध्ये पाहायला मिळतं. चित्रपटात विनोद आणि रहस्याचा अनोखा मिलाप आहे.

जाने जान – या चित्रपटात करीना कपूर, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे दमदार त्रिकूट मुख्य भूमिकेत आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. चित्रपटाची गोष्ट एका माय-लेकाच्या, शेजारी राहणाऱ्या लोकांच्या आणि एका जिद्दी पोलिस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते, जिथे प्रत्येक पात्र काही न काही लपवत असतं.

हसीन दिलरुबा – या चित्रपटाची सुरुवात एका विवाहित स्त्रीवर असलेल्या आरोपांपासून सुरू होते. पण, जशी गोष्ट पुढे जाते तसं प्रेम आणि सूड घेण्याच्या भावना वाढताना दिसतात. यामध्ये तापसी पन्नू व विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत.

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी – या चित्रपटात १९४० च्या दशकातील एका तरुण गुप्तहेराची गोष्ट पाहायला मिळते. चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी आणि माहोल इतर थ्रिलर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.

सेक्टर ३६ – हा चित्रपट नोएडा येथील चर्चित सीरियल किलरवर आधारित आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियाल यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो.