तुम्हाला क्राइम-थ्रिलर वेब सीरिज पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा काही सीरिज आहेत ज्यांना आयएमडीबीने टॉप रेटिंग दिले आहेत. या वेब सीरिज तुम्हाला खिळवून ठेवतील इतक्या जबरदस्त आहेत. चला तर जाणून घेऊया यादी.

ताजा खबर

या सीरिजमधून युट्यूबर भुवन बामने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यात त्याच्या पात्राचं नाव वसंत गावडे आहे. त्याला एक रहस्यमयी पॉवर मिळते, ज्याच्या मदतीने तो भविष्य पाहू शकतो. या शक्तीमुळे त्याचं नशीब पालटतंच, पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांची आयुष्येही बदलतात. या श्रिया पिळगांवकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

ओनली मर्डर्स इन बिल्डिंग

ही सीरिज मर्डर मिस्ट्री आहे. चार्ल्स, ऑलिव्हर आणि माबेल या तीन अनोळखी लोकांभोवती फिरते. ते न्यूयॉर्क शहरातील एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. जेव्हा त्यांच्या इमारतीत खून होतो तेव्हा ते गुप्तहेर बनतात आणि गुन्ह्याचा तपास करत असताना ते एकमेकांबद्दलची रहस्येही उघड करतात. या सीरिजला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे.

OTT वर मागच्या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेल्या ‘या’ पाच वेब सीरिज, तुम्ही बघितल्यात का? वाचा नावं

स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी


ही सिक्रेट मिशनवर आधारित सीरिज आहे. ही हिम्मत सिंह यांच्या जीवनावर बेतलेली आहे. यात त्यांना मिशनमध्ये येणारी आव्हानं दाखवण्यात आली आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ८.३ रेटिंग मिळाले आहे.

क्रिमिनल जस्टिस

ही वेब सीरिज लोकप्रिय ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिजवर आधारित आहे. ही एका प्रवाशाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आदित्य शर्मा (विक्रांत मॅसी) या तरुणावर आधारित आहे. त्यानंतर आदित्य स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना कायद्याच्या कचाट्यात सापडतो. विक्रांत मॅसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकी श्रॉफ यांनी या सीरिजमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे.

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

द फ्रीलान्सर

द फ्रीलान्सर सीरिजची सुरुवात दोन मुंबई पोलीस अधिकारी अविनाश कामथ (मोहित रैना) आणि इनायत खान (सुशांत सिंग) यांच्या एका राजकारण्याशी झालेल्या भांडणानंतर नोकरी गमावल्यापासून होते. खूप वर्षांनंतर, इनायतचा मृत्यू आणि तिची बेपत्ता मुलगी आलिया यांचे प्रकरण अविनाशचे लक्ष वेधून घेते. तो आलियाला शोधण्याची शपथ घेतो आणि धोकादायक मिशनवर एकटाच निघतो. या सीरिजला आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळाले आहे.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

सिव्हिल सर्व्हंट

सिव्हिल सर्व्हंट ही सीरिज लझार स्टॅनोजेविक आणि त्याच्या अंडकव्हर टीमची गोष्ट आहे. या सीरिजमध्ये देशाच्या सुरक्षेबाबतचे कर्तव्य पूर्ण करताना त्यांच्या समोर येणार अडचणी दाखविण्यात आल्या आहेत. जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स असलेली ही सर्बियन भाषेतील क्राईम थ्रिलर तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. या सीरिजला आयएमडीबीवर ८३. रेटिंग मिळाले आहे.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

डेअरडेव्हिल

डेअरडेव्हिल त्याच नावाच्या मार्वल कॉमिक कॅरेक्टरवर आधारित आहे. ही सीरिज मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (एमसीयू) एक भाग आहे. या सीरिजमध्ये अंध मॅट मर्डॉकचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवरी सर्वाधिक ८.६ रेटिंग असलेली सीरिज आहे.