Women’s Day Special : आजच्या काळातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. शिक्षण, कला, उद्योग, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या काम करत आहेत. म्हणूनच महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला महिला दिग्दर्शकांनी बनवलेल्या विविध विषयांवर आधारित चित्रपटांची नावं सांगणार आहोत.

महिला फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादित नाहीत; तर त्यांच्याही काही इच्छा, आकांक्षा असतात. त्यांनाही विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा असते आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे या चित्रपटांतून पाहायला मिळतं. बॉलीवूडमध्ये स्त्रीनं स्त्रीसाठी बनवलेल्या काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात…

ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट

लापता लेडीज – किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात स्त्री कलाकार केंद्रस्थानी आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं, तर एका ट्रेनमध्ये दोन नवोदित वधूंची अदलाबदली होते आणि त्यानंतर या चित्रपटाच्या कथेचा खऱ्या अर्थानं भावनिक प्रवास सुरू होतो. हा चित्रपट तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Heaven on earth – दीपा मेहता दिग्दर्शित या चित्रपटांमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत आहे. लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्यानंतर घरगुती हिंसाचारातून स्वतःची सुटका करून घेणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत प्रीती पाहायला मिळते.

इंग्लिश विंग्लिश – गौरी शिंदे दिग्दर्शित २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी मुख्य भूमिकेत आहे. नातेवाइकांना भेटण्यासाठी परदेशात गेलेली गृहिणी इंग्रजीचे धडे घ्यायला लागते आणि त्याची तिला गोडी निर्माण होते. त्यानंतर तिचा आत्मविश्वास कसा वाढतो आणि ती कशी स्वतंत्र होते हे पाहायला मिळतं. हा चित्रपट नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ, झी ५ अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

राझी – मेघना गुलजार दिग्दर्शित २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासह या चित्रपटात अभिनेता विकी कौशलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकला आहे. चित्रपटात एका भारतीय महिलेचं लग्न पाकिस्तानातील कुटुंबात झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु, हे लग्न तिनं तिला देण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेलं असतं. आलिया भट्टनं या चित्रपटामध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत झळकली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता.

सलाम वेंकी – रेवती दिग्दर्शित या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत आहे. एका छोट्याशा गावातील स्त्री तिचं दैनंदिन आयुष्य, इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि स्वतःची इतरांशी होणारी तुलना अशा कथानकावर हा चित्रपट आधारलेला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओ हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

Aisha : राजश्री ओझा दिग्दर्शित २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सोनम कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. एक श्रीमंत महिला, जी तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये जोड्या लावण्याचे काम करत असते. त्यामुळे ती अनेकदा इतरांच्या खासगी आयुष्याबद्दल तिची मतं मांडत असते. परंतु, यामुळे तिचं स्वतःच्या आयुष्यातल्याच काही गोष्टींकडे कसं दुर्लक्ष होतं हे पाहायला मिळतं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.