"तुम्हीपण बोल्ड आहात..." सेक्रेड गेम्स'मध्ये हॉट सीन्स देणाऱ्या राजश्री देशपांडेचं वक्तव्य spg 93 | trail by the fire actress rajshree deshpande open up about her bold scenes in webseries | Loksatta

“तुम्हीपण बोल्ड आहात…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये हॉट सीन्स देणाऱ्या राजश्री देशपांडेचं वक्तव्य

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून नावारूपाला आल्यानंतर अभिनेत्री राजश्री देशपांडे हे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे.

rajshree deshpande
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

नेटफ्लिक्सवर नुकतीच ‘ट्रायल बाय फायर’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. १९९७ साली दक्षिण दिल्लीमधील ‘उपहार’ चित्रपटगृहाला लागलेल्या भीषण आगीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे. यात अभय देओल आणि मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. राजश्रीने याआधीदेखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नुकतीच तिने दिलेल्या मुलाखतीत वेबसीरिज आणि बोल्ड दृश्यांवर भाष्य केलं आहे.

‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या राजश्रीने नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली आहे. तिला विचारण्यात आले की, “सेक्रेड गेम्समध्ये सुभद्राची भूमिका साकारल्यानंतर तुला बोल्ड अभिनेत्रीची पदवी मिळाली होती. तुझ्या धाडसीपणामुळे लोक तुला घाबरतात का?” त्यावर राजश्री म्हणाली, मला कळत नाही की एखादी अभिनेत्री जर परफॉर्म करत असेल तर तुम्ही तिला बोल्ड म्हणता, पण मी एका सामान्य व्यक्तीची भूमिका करत आहे.

अमृता खानविलकरबरोबर परी दिसली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

ती पुढे म्हणाली, “तुम्हीपण तितकेच बोल्ड आहात जितकी मी आहे, तुमच्यात आणि माझ्यात फरक नाही. तुम्ही पात्रांना दोष देत आहात पण तेही कधी कधी दुखी असू शकतात हे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही कलाकार पात्रांचा प्रवास दाखवतो. जर लोक मला घाबरत असतील तर मला कळत नाही ते का घाबरत आहेत. पण मला वाटतं तुम्ही जेव्हा पारदर्शक असता तेव्हा लोक तुमच्या समोर यायला घाबरतात.” अशा प्रतिक्रिया तिने दिली आहे.

‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिज मालिकेने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. या वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत होती आणि तिने या मालिकेत खूप बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या या बोल्ड सीन्सची चर्चा रंगली होती. राजश्रीने आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:36 IST
Next Story
“आम्हा दोघांचे…” संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं स्पष्ट वक्तव्य