Watch These Series & Film On OTT : वीकेंड आला की अनेक जण ओटीटीवर पाहण्यासाठी काय उपलब्ध आहे? कोणते चित्रपट प्रदर्शित झाले आहेत? ते पाहत असतात. ओटीटीवर दर आठवड्याला पाहण्यासाठी काहीतरी नवीन उपलब्ध असतंच. त्यामुळे ओटीटीमुळे घरबसल्या अनेक कलाकृतींचा आनंद घेता येतो.
थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला की, तो ओटीटीवर कधी येणार या प्रतीक्षेतही अनेक जण असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा कलाकृतींची नावं सांगणार आहोत, जे तुम्ही घरबसल्या वीकेंडला पाहू शकता आणि वीकेंडचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊयात या आठवड्यात ओटीटीवर पाहण्यासठी कोणते चित्रपट आणि सीरिज उपलब्ध आहेत.
ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट
वीकेंड आला आणि काही नवीन कलाकृतीसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या वीकेंडला पाहता येणाऱ्या ओटीटीवरील कलाकृतींच्या यादीतील पहिल्या चित्रपटाचं नाव आहे ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकांमध्ये आहेत. अनन्या यामध्ये एका पुस्तकांच्या दुकानात काम करणाऱ्या मुलीची, तर कार्तिकने वेडिंग प्लॅनरची भूमिका सााकारली आहे. परंतु, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होतं हे यामध्ये पाहायला मिळतं. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
56 Days – ही हॉलीवूडमधील एक रोमँटिक-थ्रिलर सीरिज आहे. त्यामध्ये एक मुलगा व मुलगी सुपर मार्केटमध्ये पहिल्यांदा भेटतात आणि तेव्हाच त्यांना त्यांच्यातील कनेक्शन जाणवतं आणि दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
केनेडी – हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये उदय शेट्टी नावाच्या एका माजी पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट पाहायला मिळते, जो लोकांच्या नजरेत मेलेला असतो. पण, प्रत्यक्षात तो तसा भ्रम निर्माण करतो, जेणेकरून त्याला काही बेकायदा कृती करता येतील. हा चित्रपट तुम्ही झी ५वर पाहू शकता.
‘द लास्ट थिंग्स -ही टोल्ड मी’ ही गोष्ट हॅना नावाच्या महिलेभोवती फिरते. तिचा पती ओवेन एका फसवणूक प्रकरणात अचानक बेपत्ता होतो आणि फक्त त्याची मुलगी बेलीचं संरक्षण करावं, असा संदेश असलेली एक चिठ्ठी मागे ठेवतो.’द लास्ट थिंग’चा दुसरा सीझन सध्या Apple TV+ वर स्ट्रीम होत आहे.
द नाइट एजंट – द नाइट एजंट सीझन २ ही सीरिज एक एफबीआय एजंट पीटर सदरलँडभोवती फिरते, जो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्याशी संबंधित एक धोकादायक कट उघडकीस आणतो.
