२०२६ च्या पहिल्या तिमाहीत आपल्या जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वांना थक्क करणारा चित्रपट म्हणजे ‘वाझा २: बायोपिक ऑफ अ बिलियन ब्रदर्स’ होय. या मल्याळम चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला. जर तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नसेल, तर आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही, कारण हा चित्रपट आता ओटीटीर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
हा चित्रपट ८ मे पासून जिओहॉटस्टारवर पाहता येईल. जिओहॉटस्टार मल्याळमच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘मित्रांच्या प्रचंड मागणीखातर पुन्हा परतलो आहोत! वाझा II: बिलियन ब्रोजची कथा ८ मे पासून जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होईल.’
‘वाझा 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘वाझा २’ने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले आहे. केरळमध्ये सर्वात कमी दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तो मल्याळम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने कल्याणी प्रियदर्शनचा ‘लोका चॅप्टर १’ (ज्याला १०० कोटींसाठी २४ दिवस लागले) आणि मोहनलाल यांचा ‘थुडारुम’ (१९ दिवस) या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अवघ्या १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात १२८ कोटींची कमाई केली आहे.
‘वाझा २’चे जगभरातील कलेक्शन आणि IMDb रेटिंग
या चित्रपटाने तब्बल २३३.६३ कोटींचा गल्ला जमवला आहे. १० कोटींच्या बजेटमधील प्रादेशिक भाषेतील चित्रपटासाठी ‘ब्लॉकबस्टर’ हा शब्दही लहान वाटेल. या चित्रपटाचे IMDb रेटिंग ८.३ इतके जबरदस्त आहे.
‘वाझा २’ची स्टारकास्ट आणि कथा
या चित्रपटात हाशिर एच., एलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक वी. मुख्य भूमिकेत आहेत. तसेच विजय बाबू, अजू वर्गीस, बिजुकुट्टन, अल्फोन्स पुथरेन आणि सुधीश यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ही कथा हाशिर, एलन, अजिन आणि विनायक या चार अतिशय खोडकर मित्रांभोवती फिरते. हे मित्र सामाजिक दबाव आणि अभ्यासातील आव्हानांचा सामना करतात, तसेच त्यांच्यावर कौटुंबियांच्या अपेक्षांचे ओझेही वाढत जाते. ही गोष्ट त्यांच्या शालेय जीवनापासून ते तरुणपणापर्यंतच्या प्रवासावर आधारित आहे.
दरम्यान, या सीरिजमधील पहिला चित्रपट ‘वाझा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’ २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. आनंद मेनन दिग्दर्शित या चित्रपटात सिजू सनी, अमित मोहन राजेश्वरी, जोमोन ज्योथिर, अंशिद अनु, अनुराज ओ. बी., साफ, जगदीश, कोट्टायम नझीर, अझीझ नेदुमंगड आणि नोबी मार्कोस या कलाकारांनी काम केलं होतं.
‘वाझा ३’ ची घोषणा
दुसऱ्या भागाच्या यशानंतर, निर्मात्यांनी आता ‘वाझा ३’ ची घोषणा केली आहे. याची टॅगलाईन ‘बायोपिक ऑफ बिलियन गर्ल्स’ अशी आहे. या तिसऱ्या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व कलाकार महिला असणार आहेत. विश्वन श्रीजीत या सिनेमाचे दिग्दर्शक असतील.
