OTT Trending Movie: एखादा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप ठरतो, पण ओटीटीवर गाजतो. अशा सिनेमांमध्ये आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला एक सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा कोणता? हे जाणून घेऊ…

गेल्या काही दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमा हा ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, या आठवड्यात ट्रेडिंग लिस्टमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक क्राइम थ्रिलर सिनेमा भारतात ट्रेडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे.

IMDB ने दिले ७.४ रेटिंग

या चित्रपटात ६६ वर्षीय अभिनेत्री आणि ६२ वर्षीय अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे. यामध्ये मंजू सिंह व शंभुनाथ मिश्रा यांची आहे. मंजू सिंह खोट्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असते. तर, शंभुनाथ मिश्रा हे हवालदार म्हणून काम करतात.

Award Banner

ज्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुटुंबात कोणीही नाही. कारण-मुलगा परदेशात स्थायिक झालेला असतो आणि शंभू कर्जाच्या ओझ्याखाली असतो. यादरम्यान, शंभू व मंजू यांची भेट होते. ते तुरुंगात एकमेकांना लपूनछपून भेटतात. यामध्ये एकीकडे प्रौढ वयातील प्रेम, रोमान्स पाहायला मिळतो तर दुसरीकडे मर्डर मिस्ट्री पाहायला मिळते. वध २ असे या चित्रपटाचे नाव आहे.

मंजूच्या हातून एक खून होतो. आता हा खून कसा होतो, पुन्हा तो मृतदेह कसा लपवला जातो, पुढे काय होते, हे या चित्रपटात पाहायला मिळते.

सिनेमात मंजू ही भूमिका नीना गुप्तांनी साकारली आहे. शंभूच्या भूमिकेत संजय मिश्रा आहेत. जेव्हा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. तेव्हा तो फ्लॉप ठरला होता. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. हा सिनेमा आता ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होताना दिसत आहेत. हा सिनेमा २ तास ८ मिनिटांचा आहे.

याबरोबरच, ‘वध २’ या सिनेमाला आयएमडीबीने ७.४ रेटिंग दिली आहे.