Vadhuvu Web Series OTT: मिस्ट्री थ्रिलर कंटेंटच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर एक जबरदस्त सीरिज उपलब्ध आहे. ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गोर हिची मुख्य भूमिका असलेली ‘वधुवू’ ही तेलगू वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. कृष्णा पोलुरु यांनी दिग्दर्शित केलेली ही ७ भागांची सीरिज ‘होइचोई’ वाहिनीच्या अत्यंत गाजलेल्या ‘इंदू’ या बंगाली थ्रिलर सीरिजचा अधिकृत रिमेक आहे. स्वतःच्या बहिणीने दिलेल्या दगाफटक्यानंतर मुख्य नायिका दुसऱ्या घरात लग्न करून जाते, मात्र तिथे पाऊल ठेवताच तिच्यासमोर सासरच्या लोकांची अशी काही धक्कादायक रहस्ये येतात की तिचे पूर्ण आयुष्य बदलून जाते. ही उत्कंठावर्धक सीरिज आता ‘जिओ हॉटस्टार’वर उपलब्ध आहे.

‘वधुवू’ असं या सीरिजचं नाव आहे. ही एक तेलगू वेब सिरीज असून तिचे दिग्दर्शन कृष्णा पोलुरु यांनी केले आहे. ‘झी५’ वरील ‘रेस’ या सीरीजसाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा पोलुरू यांची ही नवी सीरिज आहे. २०२३ मध्ये ‘जिओहॉटस्टार’ वर रिलीज झालेली ही तेलगू मिस्ट्री वेब सीरिज, ‘होइचोई’च्या ‘इंदू’ या प्रसिद्ध बंगाली थ्रिलर सीरीजची अधिकृत रिमेक आहे.

ही कथा एका तरुण महिलेची आहे, लग्नानंतरच्या तिच्या नव्या आयुष्यात एक धक्कादायक वळण येतं. कारण तिला तिच्या पतीच्या घरात लपलेली धक्कादायक रहस्ये समजतात.

‘वधुवू’ सीरिजमधील कलाकार

‘वधुवू’ सीरिजमध्ये अविका गौर, नंदू, अली रेजा, मोनिका, माधवी प्रसाद, अम्मा रमेश, के एल के मणी, सौजस, सुरभी पद्मजा आणि दीप्ती या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

‘वधुवू’ की कहानी

या सीरिजमध्ये अविका गौरने इंदू नावाची भूमिका केली आहे. ती एका मोठ्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असते. ती संजयबरोबर लग्नाची तयारी करत असते, पण तेव्हाच एक घटना घडते. संजय इंदूची धाकटी बहीण भानूबरोबर पळून जाते. भानूला कायम इंदूचा हेवा वाटायचा, त्यामुळे तिला कुटुंबीय हाकलून देतात. इतका अपमान आणि प्रेम भंगानंतर इंदूचं लग्न आनंदबरोबर ठरतं.

अविका गौरने या सीरिजमध्ये एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. तिने तिची भूमिका उत्तम साकारली आहे. त्याचबरोबर अली रजाने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे. दुसरीकडे नंदूने सीरिजचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

‘वधुवू’ सीरिजचा प्रत्येक एपिसोड नव्या ट्विस्टने भरलेला आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ६.४ रेटिंग मिळाले आहे. ही सीरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. तुम्ही ही मिस्ट्री थ्रिलर सीरिज आतापर्यंत पाहिली नसेल तर ती जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.