Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) या मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. वयाच्या ५६ व्या वर्षीही त्या फिट अँड फाईन आहेत. वर्षा उसगांवकर यांची चर्चा होते आहे कारण बिग बॉस या मराठी मराठी शोमध्ये त्या आहेत आणि सध्या घराच्या कॅप्टन झाल्या आहेत. आता वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फिटनेसचा फंडा काय ते देखील सांगितलं आहे.

बिग बॉसच्या घरात काय झालं?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सर्वात पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर झाली होती. त्यानंतर अरबाज पटेल नॉमिनेट झाला होता, मात्र घरासाठी बीबी करन्सी मिळवण्यासाठी त्याने ही कॅप्टन्सी निक्की तांबोळीला देऊ केली. निक्कीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मोठा राडा झाला. दरम्यान शुक्रवारी पार पडलेल्या टास्कमध्ये वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) यांना कॅप्टन्सीचा मान मिळाला आणि विशेष म्हणजे सर्वानुमते त्यांची निवड झाली.

Netflix Kandahar hijacking series controversy
IC-814: The Kandahar Hijack: कंदहार हायजॅक वेबसीरीजमध्ये अतिरेक्यांची हिंदू नावे; वाद उफाळल्यानंतर नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Family Shows on OTT
कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे? OTT वरील ‘हे’ फॅमिली शो नक्की पाहा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?
recent OTT release
या वीकेंडला OTT वर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् सीरिजची यादी!
Bad News on OTT
१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपट आला OTT वर, या वीकेंडला बॅड न्यूजसह ‘हे’ सिनेमे घरबसल्या पाहता येणार
Superhit South Indian Movies on OTT
एकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तर काहींनी गाजवलं बॉक्स ऑफिस; तुम्ही पाहिलेत का हे सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट?

वर्षा उसगांवकर घराच्या कॅप्टन

वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यामुळे आता येणाऱ्या आठवड्यात त्यान नॉमिनेट होण्यापासून सुरक्षित झाल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांनी आधीच्या आठवड्यांमध्ये कॅप्टन होण्याच्या स्पर्धेतून माघार घेतली होती, मात्र यावेळी त्यांनी खेळात सहभाग घेतला आणि जिंकून दाखवलं ज्यानंतर बिग बॉसच्या घरात सेलिब्रेशन पार पडलं. कॅरिमल कस्टर्ड तयार करताना वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) यांनी त्यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य सांगितलं.

हे पण वाचा- Video : हमारा नेता कैसा हो…; ‘बिग बॉस’ने पालटली बाजी; वर्षा उसगांवकर ‘अशा’ झाल्या नव्या कॅप्टन! नेमकं काय घडलं?

काय आहे वर्षा उसगांवकर यांच्या फिटनेसचं रहस्य?

‘अनसीन अनदेखा’मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यामुळे कॅरीमल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. यावेळ वर्षा उसगांवकरांच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळचं तेज आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

Varsha Usgaonkar News
वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. (फोटो सौजन्य- वर्षा उसगांवकर, इंस्टाग्राम पेज)

कॅरीमल कस्टर्ड खात काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

वर्षा ताई कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरीमल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरीमल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय, असं त्या म्हणाल्या. आता तुम्हाला कळलंच असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे, असं कॅरमल कस्टर्ड खात वर्षा उसगांवकर पुढे म्हणत आहेत. वर्षा उसगांवकर यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.