तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार विजय थलपती यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट म्हणून ‘जन नायकन’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट पाहण्याासाठी विजय यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. अशातच आता थिएटरनंतर अखेर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्या ‘जन नायकन’च्या ओटीटी रिलीजची चर्चा सुरू आहे. अशातच तमिळ सिनेसृष्टीतील या दमदार पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपटा ओटीटीवर कधी आणि कुठेरिलीज होणार , याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

जन नायकन ओटीटीवर कधी येणार?

दाक्षिणात्य चित्रपटांच्या ओटीटी रिलीजचा विचार केला तर, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर साधारण महिनाभरात हे चित्रपट ओटीटीवर रिलीज केले जातात. ‘जन नायकन’च्या ओटीटी रिलीजबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जन नायकन’ २१ सप्टेंबर २०२६ रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहता येणार आहे. मात्र, ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये.

मात्र, ‘जन नायकन’च्या हिंदी ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटा हिंदी भाषेत झी ५ ऐवजी वेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, विजय यांच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

बॉक्स ऑफिसवर जन नायकनचा धुमाकूळ

विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट म्हणून चर्चेत असलेल्या ‘जन नायकन’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या १९ दिवसांत या चित्रपटाने आतापर्यंत जागरणच्या वृत्तानुसार १९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर ‘जन नायकन’ने सुमारे ३२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.