Visfot Movie Trailer : अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे प्रचंड चर्चेत आहे. यंदा पहिल्यांदाच तो ‘बिग बॉस’च्या होस्टिंगची जबाबदारी निभावत आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’ला आणि विशेषत: भाऊच्या धक्क्याला दमदार टीआरपी मिळत असताना अभिनेत्याने आणखी एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. येत्या काही दिवसांत रितेशची प्रमुख भूमिका असलेला एक नवीन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया बापट व रितेश देशमुख ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

फरदीन खान आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘विस्फोट’ ( Visfot ) हा हिंदी थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन कूकी गुलाटी यांनी केलं असून नुकताच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यावर नो एन्ट्री! शिक्षेची आठवण करून देत रितेश देशमुख म्हणाला

‘विस्फोट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका प्रिया बापटने साकारल्याचं स्पष्ट होत आहे. एकीकडे बायकोचं बाहेर अफेअर अन् दुसरीकडे किडनॅप झालेला मुलगा या दोन्ही गोष्टींतून हिरो कसा मार्ग काढणार याचा उलगडा ‘विस्फोट’ ( Visfot ) या चित्रपटातून होणार आहे. याशिवाय फरदीन खान साकारत असलेल्या पात्राच्या आयुष्यात देखील या दरम्यान अनेक चढउतार येत असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : …अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

हेही वाचा : Telugu Film Industry MeToo: तेलुगू सिनेसृष्टीतील लैंगिक शोषणाचा अहवाल सरकारनं बासनात गुंडाळला; म्हणे, “त्यात कारवाई करण्यासारखं काहीच नाही”!

( Visfot Movie Poster)

‘विस्फोट’ ( Visfot ) हा सिनेमा ‘रॉक, पेपर, सिजर्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा रिमेक आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल. दरम्यान, ‘हे बेबी’ सिनेमानंतर रितेश देशमुख व फरदीन खान यांची जोडी ‘विस्फोट’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेश अन् प्रिया देखील एकत्र झळकणार असल्याने मराठी प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.