Best mystery thriller on OTT : ओटीटी मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. वेगवेगळे कथानक असलेले आणि वेगवेगळ्या भाषेतील अनेक सीरिज, चित्रपट आणि रिअॅलिटी शो सहज यामार्फत घरबसल्या पाहता येतात. त्यामुळे ओटीटीवर अनेक जण प्रामुख्याने थ्रिलर, क्राईम, कॉमेडी अशा जॉनरचे चित्रपट पाहत असतात. विशेष म्हणजे सध्या प्रेक्षकांना मिस्ट्री थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेले चित्रपट खूप आवडत आहेत. या जॉनरच्या सिनेमांचा आणि सीरिजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशा कथा शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवतात, त्यामुळेच त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अशाच प्रकारचा एक मल्याळम चित्रपट आहे, ज्याच्या प्रत्येक सीनमध्ये भरपूर सस्पेन्स आहे. जर तुम्ही मिस्ट्री थ्रिलरचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 

काय आहे चित्रपटाची कथा?

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्या मल्याळम मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचं नाव आहे ‘संभवम अध्यायम ओन्नु’ (sambhavam adhyayam onnu) २ तास ९ मिनिटांच्या या चित्रपटात अनेक धक्कादायक सीन आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. ही कथा केरळ-तामिळनाडू सीमेवरील वेल्लूरक्कट्ट या शापित जंगलाभोवती फिरते.

‘संभवम अध्यायम ओन्नु’ या चित्रपटाची कथा सुरू तीन पोलीस अधिकारी त्यांच्या हरवलेल्या सहकाऱ्याचा शोध घेण्यासाठी या जंगलात जातात. पण लवकरच ते एका धोकादायक टाइम-लूपमध्ये अडकतात. या दरम्यान, एका अधिकाऱ्याला स्वतःचाच मृतदेह सापडतो. पुढे ही कथा गडद सस्पेन्स आणि भीतीने भरलेली आहे. 

चित्रपटात कोणते कलाकार आहेत?

‘संभवम अध्यायम ओन्नु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू सतीशन यांनी केले असून, कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. या चित्रपटात नीतू कृष्णा, असकर अली आणि सिद्धार्थ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सर्व कलाकारांनी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. 

कुठे पाहू शकता चित्रपट?

‘संभवम अध्यायम ओन्नु’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.३ रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटात हॉररबरोबर सस्पेन्सचा जबरदस्त तडका आहे. जर तुम्हाला काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायचं असेल, तर हा चित्रपट नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असला पाहिजे.