Watch These Comedy Suspense Malayalam Movies On OTT : ओटीटीवर अनेक प्रादेशिक भाषिक चित्रपट व सीरिज मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत असतात. यामध्ये अनेक जॉनरचे चित्रपट पाहायला मिळतात. त्यात कॉमेडी हा अनेकांना आवडणारा जॉनर आहे. पण, याच कॉमेडीला सस्पेन्सची जोड मिळाली तर चित्रपट पाहण्याची मजा दुप्पट होते.
ओटीटीवर सध्या अनेक कॉमेडी आणि सस्पेन्स असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. यातीलच तीन मल्याळम कॉमेडी आणि सस्पेन्स असलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे चित्रपट कोणते आहेत आणि या चित्रपटांची कथा काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
कॉमेडी-सस्पेन्सचा फुल डोस असलेले चित्रपट
रोमांचम – ओटीटीवर उपलब्ध असलेल्या कॉमेडी व सस्पेन्स असणाऱ्या मल्याळम चित्रपटांच्या यादीतील हे पहिलं नाव आहे. ही बंगळुरूत राहणाऱ्या सात मित्रांची गोष्ट आहे. मस्ती मौजेने भरलेल्या या चित्रपटात एक भयानक वळण आलेलं पाहायला मिळतं. विनोदाने भरलेला हा चित्रपट थ्रिलर नसला तरी यामध्ये काही भयानक सीन्स पाहायला मिळतात. ‘रोमांचम’ हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर घरबसल्या पाहू शकता.
आदि कप्यारे कटुमणी – या चित्रपटात एका अशा मुलाची गोष्ट पाहायला मिळते, जो एका मुलीला गुपचूप त्याच्या खोलीमध्ये घेऊन येतो. पण त्याचं हे नियोजन फसतं, जेव्हा हॉस्टेलमध्ये भीतीदायक घटना घडायला लागतात. मुलांच्या हॉस्टेलमधील या भीतीदायक घटना आणि त्यांची मस्ती यामुळे या चित्रपटाला अजूनच रंगत येते.
उपलब्ध असणाऱ्या कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेल्या तिसऱ्या मल्याळम चित्रपटाचं नाव आहे ‘सुमथी वलवू’ हॉरर आणि कॉमेडी अशा दोन्ही गोष्टी एकाच चित्रपटातून पाहण्याची इच्छा असेल तर ओटीटीवरील हा मल्याळम चित्रपट नक्की पाहा. चित्रपटाच्या कथेत वळण येतं, जेव्हा यातील नायक एका भीतीदायक रस्त्यावरून जात असतो. चित्रपटात अनेक मजेदार ट्विस्ट पाहायला मिळतात. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर घरबसल्या झी ५ वर पाहू शकता.

