अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाने धमाल विनोदी कथेमुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
अक्षय कुमर मुख्य भूमिकेत असलेला आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांची फौज असलेला ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट जागरणच्या वृत्तानुसार आता ओटीटीवर रिलीज होत आहे. ऑगस्ट महिन्यात ‘वेलकम टू द जंगल’ ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा हा मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट ओटीटीवर कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल, याबद्दल जाणून घेऊयात…
‘वेलकम टू द जंगल’ ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार?
२६ जून रोजी ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कामगिरी केली. सध्या चित्रपट प्रदर्शित होताना त्याचा डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर कोण आहे, याची माहितीही आधीच दिली जाते. ‘वेलकम टू द जंगल’च्या प्री-क्रेडिट सीनमध्येही चित्रपटाचा ओटीटी पार्टनर कोण आहे, याबाबत थोडी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार, थिएटरनंतर ‘वेलकम टू द जंगल’ हा कॉमेडी चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच जिओ हॉटस्टारने या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले होते. त्यामुळे ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत निर्माते किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
चित्रपटाच्या या ओटीटी रिलीजबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही, विविध वृत्तांनुसार ‘वेलकम टू द जंगल’ ऑगस्टमध्येच ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, त्यांना लवकरच जिओ हॉटस्टारवर तो पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘वेलकम टू द जंगल’ या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षय कुमारसह अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. यामध्ये सुनील शेट्टी, दिशा पाटणी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, फरीदा जलाल, अरशद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, किरण कुमार, जाकीर हुसेन, दलेर मेहंदी, आफताब शिवदासानी आणि विंदू दारा सिंग यांचा समावेश आहे.
