वेब सीरिज ‘आर्या’मधून आपल्या दमदार अभिनयाने कमबॅक करणारी अभिनेत्री सुश्मिता सेन लवकरच ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी वेब सीरिज ‘ताली’मध्ये सुश्मिता सेन ट्रान्सवूमन गौरी सावंत यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमधील सुश्मिता सेनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्यानंतर ट्रान्सवूमन गौरी सावंत यांच्याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तृतीयपंथी लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामाचं कौतुकही केलं होतं.

गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. बरीच संकटं आणि दुःखांचा सामना त्यांना करावा लागला आहे. एवढंच नाही तर त्यांच्या वडिलांना जिवंतपणीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच चढ- उतार पाहिले आहेत. आज त्या तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी आणि हितासाठी काम करतात.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

गौरी सावंत यांचा जन्म मुंबईच्या दादर येथील एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई- वडिलांनी त्यांचं नाव गणेशनंदन असं ठेवलं होतं. गौरी ७ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांच्या आजीने त्यांना लहानाचं मोठं केलं. गौरी यांचे वडील एक पोलीस अधिकारी होते. गौरी यांना त्यांच्या सेक्शुअलिटीबाबत माहिती होती मात्र हे वडिलांना सांगण्याएवढी हिंमत त्यांच्याकडे नव्हती. शाळेत असताना मुलं गौरी यांची खिल्ली उडवत असत. हळूहळू त्या मुलांकडे आकर्षित होत होत्या. त्यावेळी त्यांना गे असण्याचा अर्थ काय हेसुद्धा माहीत नव्हतं. पण त्या गुपचूप आजीची साडी नेसत असत.

आणख वाचा- सुश्मिता सेन झळकणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, मराठमोळ्या दिग्दर्शकाबरोबर करणार काम

शाळेत असताना गौरी सावंत यांनी सगळी परिस्थिती जेमतेम सांभाळली मात्र जेव्हा त्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्या तेव्हा जास्त समस्या येऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबाने त्यांची सेक्शुअलिटी कधीच मान्य केली नाही. कुटुंबाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी गौरी यांनी घर सोडलं. त्यावेळी त्याचं वय १५ वर्षं होतं. नंतर त्यांनी वेजिनोप्लास्टी करून घेतली आणि गणेशनंदन ही ओळख पुसून त्या गौरी सावंत झाल्या.

गौरी सावंत यांनी ‘हमसफर ट्रस्ट’च्या मदतीने स्वतःला बदललं. जेव्हा त्यांनी घर सोडलं तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा किंवा खाण्यासाठी अन्न मिळावं एवढे पैसेही नव्हते. पण हिंमत न हारता त्यांनी आपली लढाई चालूच ठेवली. २००० साली गौरी सावंत यांनी अन्य दोन लोकांच्या मदतीने ‘सखी चार चौघी’ मंचाची स्थापना केली. तेव्हापासून त्या तृतीयपंथी समजासाठी काम करत आहेत. आपल्या एनजीओच्या माध्यमातून त्या घर सोडलेल्या ट्रान्सजेंडर्सची मदत करतात. २००९ मध्ये त्यांनी तृतीयपंथी समाजाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दिला होता. ‘नाझ’ फाउंडेशनने या कामात त्यांना पाठिंबा दिला. अखेर गौरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत ट्रान्सजेंडर कायद्याला मान्यता दिली.

आणखी वाचा- ‘रामायणा’त रावण साकारणाऱ्या अभिनेत्याने हेमा मालिनींच्या लगावली होती कानशिलात, वाचा नेमकं काय घडलं

गौरी सावंत यांनी फक्त तृतीयपंथी समाजाच्या हक्कासाठीच लढाई लढली नाही तर त्यांनी एका मुलीला वेश्या व्यवसायात ढकललं जाण्यापासून वाचवलं. एवढंच नाही तर या मुलीला त्यांनी कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि तिचं संगोपन केलं. यातून गौरी सावंत यांनी आई हा शब्द विशिष्ट लिंगाशी मर्यादित राहत नाही हे सिद्ध केलं. या मुलीचं नाव गायत्री होती. ती एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुलगी होती. जिच्या निधनानंतर या मुलीलाही त्याच व्यवसायात जाण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. त्यावेळी गौरी यांनी या मुलीला दत्तक घेतलं. आज ही मुलगी एका हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.

गौरी सावंत या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर इलेक्शन अँबेसिडर आहेत. काही वर्षांपूर्वीच त्या विक्स कंपनीच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आल्या होत्या. या जाहिरातीत त्या एका लहान मुलीसह दिसत होत्या. या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं की, त्या मुलीच्या आई- वडिलांचं निधन होतं आणि त्यानंतर गौरी सावंत तिला दत्तक घेतात. या जाहिरातीमुळे गौरी सावंत चर्चेत आल्या होत्या.