Why Dhurandhar On Netflix Is 4 Minutes Shorter: काही चित्रपटांची सर्वत्र चर्चा होते. ‘धुरंधर’ अशा चित्रपटांपैकीच एक आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर त्याने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्लाही जमवला.

सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट, सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चौथा चित्रपट असे अनेक रेकॉर्ड ‘धुरंधर’ने त्याच्या नावे केले आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर कलाकारांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले. चित्रपट ज्या प्रकारे मांडला, चित्रपटाची कथा जशी पुढे गेली, तसेच कलाकारांचा अभिनय, त्यांनी साकारलेली पात्रे याचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. चित्रपटातील गाण्यांनीदेखील लक्ष वेधून घेतले.

‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल हे आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. सर्वच कलाकारांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले असले तरी अभिनेता अक्षय खन्नाने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले.

त्याची रेहमान डकैत ही भूमिका चर्चेत आली. त्याने ज्या पद्धतीने हे पात्र साकारले आहे, त्याचे कौतुक झाले. तसेच अक्षय खन्नाचा डान्स, त्याची प्रत्येक भावना व्यक्त करण्याचा अंदाज, यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवून थिएटरमध्ये जवळजवळ दोन महिने मनोरंजन केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाचा कालावधी कमी का झाला?

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून अनेकजण हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत होते, मात्र चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वि्स्ट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. याचे कारण म्हणजे थिएटरपेक्षा चित्रपट नऊ मिनिटे कमी दाखवला गेला आहे. दुसरे कारण म्हणजे काही डायलॉगदेखील म्यूट केले आहेत. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी नेटफ्लिक्सला टॅग करत निराशा व्यक्त केली आहे. अनेकांनी कालावधी, डायलॉग म्यूट याबरोबच कलर ग्रेडिंग, आवाज आणि व्हिडीओच्या दर्जाबद्दलही लिहिले आहे.

मात्र, हा चित्रपटाचा कालावधी कमी का झाला हे तुम्हाला माहीत आहे का?

काही रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना चित्रपटातील काही डायलॉग म्यूट करण्यास सांगितले होते. त्यानंतर बलोचशी निगडीत दोन शब्द आणि एक डायलॉग म्यूट करण्यात आला होता. त्यानंतर धुरंधरला दिलेल्या सेन्सॉर बोर्डच्या प्रमाणपत्रानुसार चित्रपटाचा नवीन कालावधी हा ३ तास २८ मिनिट आणि ५६ सेकंद इतका आहे. १ जानेवारीपासून थिएटरमध्ये चित्रपटाची ही सुधारित आवृत्ती दाखवली जात होती.

सुरुवातीला चित्रपटाचा कालावधी हा ३ तास ३४ मिनिट इतके होता, मात्र १ जानेवारीपासून चित्रपटाचा कालावधी हा ३ तास २८ मिनिटे ५६ सेकंद इतका झाला आहे. आता ओटीटीवर चित्रपटाचा कालावधी हा ३ तास २५ मिनिटे इतका आहे, त्यामुळे चित्रपट नऊ नाही तर चार मिनिटे कमी दिसत आहे. त्याचे कारण हे थिएटरपेक्षा चित्रपट ओटीटीवर फास्ट दिसत आहे, असे काहींनी लिहिले आहे, त्यामुळे चित्रपट सेन्सॉर किंवा कापला नसून तो मूळ चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

Dhurandhar is not 10mins Cut on Netflix from it’s Theatrical Version.

The difference is because Netflix playback uses 25fps while movies are generally shot at 24 fps. So this means your playback at Netflix will be 4% faster overall. This translates to ~9 minutes shorter runtime— Vivek Verma (@vvindia) January 30, 2026

दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर निर्माते किंवा दिग्दर्शक आदित्य धर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.