अनुष्का घेउन आली ‘पाताल लोक’; क्राईम अन् सस्पेंसने भरलेला ट्रेलर रिलीज

पाताल लोक वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती आपली नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचे नाव ‘पाताल लोक’ असं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – PM Care फंडातील निधीचं काय केलं?; अभिनेत्रीचा मोदी सरकारला सवाल

या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पाताल लोक’ची निर्मिती स्वत: अनुष्काने केली आहे. खोट्या बातम्या, भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, धार्मिक भेद अशा विषयांवर आधारित ही सीरिज आहे. प्रतिष्ठीत समाजाची गडद बाजू दाखवण्याचा प्रयत्न या सीरिजमधून केला जाणार आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – या चित्रपट दिग्दर्शकाने केली आत्महत्या

ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर येत्या १५ मे पासून पाहता येईल. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी यांसारखे प्रसिद्ध कलाकार अभिनय करताना दिसतील. NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची पटकथा लिहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paatal lok trailer crime in delhi mppg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या