अक्षय कुमारच्या आगामी बहुचर्चित ‘पॅडमॅन’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगानंथम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. पॅडमॅन आणि त्यांची पत्नी यांच्यातील प्रेमळ नात्याचे चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे. यामध्ये अक्षयच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री राधिका आपटे साकारत आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणे अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केले आहे.
Witness a superhero's innovative love! Here's the first song from @PadManTheFilm #AajSeTeri https://t.co/QBclfCRmVa@radhika_apte @sonamakapoor @mrsfunnybones @SonyPicsIndia @kriarj #RBalki
— Akshay Kumar (@akshaykumar) December 20, 2017
हा चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या कोईमतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना निर्मित हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल. मासिक पाळी हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब आहे. मात्र, याच विषयावर अक्षयचा चित्रपट भाष्य करणार असल्यामुळे त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.