Entertainment News Today, 24 April 2025 : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बॉलीवूड सेलिब्रिटी व मराठी कलाकार निषेध करत आहेत. त्याचबरोबर मराठी मालिकांमध्ये अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. आजच्या मनोरंजनविश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या…
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
कलाकार नाही, दिग्दर्शक नाही अन् काहीच नाही! फक्त १० लाख रुपयांत पुजाऱ्याने 'असा' बनवला चित्रपट, सर्वत्र होतेय चर्चा
"हा कोण आहे?" प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ट्रोलिंगबाबत म्हणाले, "आम्ही त्यांची तोंडं बंद…"
"…त्यामुळे तिने मला सोडले", परवीन बाबी व कबीर बेदी यांचे का झाले होते ब्रेकअप? स्वत: खुलासा करत म्हणालेले…
"देवावरही टीका होते, मग मी कोण?", घटस्फोटाच्या निर्णयानंतर झालेल्या ट्रोलिंगवर ए. आर. रेहमान यांनी सोडलं मौन, म्हणाले…
'कोण होतीस तू…' मालिकेसाठी मंदार जाधवने केलीय 'अशी' मेहनत, भूमिकेबद्दल म्हणाला, "जयदीप थोडा रागीट होता पण…"
"स्वत: पाकिस्तानी कलाकारांसह काम करते आणि…", पहलगाम हल्ल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर बॉलीवूड अभिनेत्रीने दिले उत्तर, म्हणाली…
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाबद्दल सरकारचा मोठा निर्णय
Video : 'शोले'मध्ये गब्बरला मारणारा बूट कसा बनवलेला माहितीये का? चित्रपटातून डिलीट केलेला 'तो' सीन व्हायरल
"कोण कपूर, कोण अभिनेता, कसला…", आलिया भट्टच्या सावत्रभावाचं रणबीर कपूरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, "तो त्याच्या मुलीवर…"
Shatrughan Sinha on Pahalgam Terrorist Attack : हिंदू हिंदू का म्हणताय?
Shatrughan Sinha on Pahalgam Terrorist Attack : शत्रुघ्न सिन्हा दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहलगामबद्दल विचारल्यावर काय घडलंय तिथे? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर एक व्यक्ती 'तिथल्या हिंदूंबरोबर जे काही घडत आहे...' असं म्हणाली. हे ऐकून शत्रुघ्न सिन्हा संतापले. 'हिंदू, हिंदू का म्हणत आहात? तेथील हिंदू, मुस्लिम, सर्व भारतीय आपले आहेत,' असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "हे गोदी मीडिया गरजेपेक्षा जास्त या गोष्टी चालवत आहेत. प्रोपगंडा वार जास्तच सुरूये. आमचे मित्र माननीय पंतप्रधान मोदीजी, त्यांच्या पक्षाकडून... हे खूप जास्त चालू आहे. मला वाटते की हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, याचा खूप खोलवर विचार केला पाहिजे, आपण असं काहीही बोलू नये किंवा असं काहीही करू नये किंवा बोलू नये ज्यामुळे तणाव वाढेल."
https://www.instagram.com/reel/DIzjHg-hrnJ/?utm_source=ig_web_copy_link
"७५ वर्षांपासून सहन करतोय, आता पुरे…"; माजी लष्करी अधिकारी खुशबू पाटनींचा संताप; म्हणाल्या, "मी काश्मीरमध्ये २ वर्ष…"
नाना पाटेकरांनी अचानक केलेला 'तो' फोन अन्…; भरत जाधव यांनी सांगितला किस्सा, म्हणाले, "मला खूप…"
"बॉलीवूडला सुधारण्याची गरज", सध्याच्या चित्रपटांबद्दल आमिर खानचं स्पष्ट मत, म्हणाला, "इतर इंडस्ट्रीमध्ये…"
'आली ठुमकत नार लचकत...' गाण्यावर वैभव तत्ववादीचा 'या' अभिनेत्रीसह डान्स; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी म्हणाले…
Video: डॅडी सूर्याच्या आईचा छळ करणार, डांबून ठेवणार अन्…; 'लाखात एक आमचा दादा'मध्ये ट्विस्ट
"गुडघ्याची गादी फाटली अन्…", सुकन्या मोनेंनी दीड वर्षांचा ब्रेक का घेतला? 'स्टार प्रवाह'च्या नवीन मालिकेतून पुनरागमन करणार
"मला मुस्लीम म्हणून लाज वाटतेय की...", पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक संतापला; म्हणाला, "इस्लाम हे..."
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, "मांसाहार सोडला, दारू…"
"माझी मानसिक अवस्था बरी नाही", छोटा पुढारीबरोबर डान्स केल्यानंतर जान्हवी किल्लेकरची प्रतिक्रिया, म्हणाली…
शेरनीला भेटलो...! निक्की तांबोळीच्या घरी पोहोचला सूरज चव्हाण! आई-बाबांची घेतली भेट; कारण आहे खूपच खास…
"माझी वेळ आली नव्हती…", सैफ अली खानचं घरात झालेल्या हल्ल्याबद्दल वक्तव्य; म्हणाला, "पुढचे काही दिवस मी…"
'लक्ष्मी निवास' फेम भावना व जान्हवीने केले लक्ष्मीचे कौतुक; म्हणाल्या, "ती एका कोणावर जास्त प्रेम करताना दिसली, तर…"
"या फोटोमागे खूप मोठी गोष्ट..." म्हणत अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला रेखांबरोबरचा फोटो
"आपण कुठे राहतो, हे...", पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानी कलाकारांच्या पोस्ट; म्हणाले, "या भीषण घटनेतील..."
पाकिस्तानी कलाकारांनी दहशवादी हल्ल्याबद्दल पोस्ट केल्या आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून २० पर्यटक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.