आयटम गर्लचं ट्रोलिंग थांबवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराची धडपड

पाकिस्तानी आर्मी सर्व काम सोडून नेटकऱ्यांना भिडली

सोशल मीडियावर सध्या एका आयटम साँगने खळबळ उडवली आहे. हे गाणे ‘काफ कंगना’ या पाकिस्तानी चित्रपटातील आहे. या गाण्यात नाचणारी अभिनेत्री भारतीय दाखवण्यात आली असुन, ती पाकिस्तानी सैन्यासाठी नृत्य सादर करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या गाण्यात नृत्य सादर करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव नीलम मुनीर असे आहे. या गाण्यामुळे नेटकऱ्यांनी तिला व पाकिस्तानी लष्कराला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या ट्रोलिंगला थांबवण्यासाठी पाकिस्तानी आर्मी सर्व काम सोडून नेटकऱ्यांना भिडली आहे.

पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. “पाकिस्तानी सेनेचे मुख्यालय इस्लामाबादमध्ये नसून रावळपिंडी येथे आहे. तसेच तिथे गाण्याचा असा कुठलाही कार्यक्रम कधीही झालेला नाही. त्यामुळे आधी चित्रपट पाहा आणि त्यानंतर याबाबत आपल्या प्रतिक्रीया द्या” अशा शब्दात ट्विटच्या माध्यमातून आसिफ गफूर यांनी ट्रोलर्सला प्रतिक्रीया दिली. मात्र, त्यांच्या या ट्विटचा नेटकऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan dg ispr asif ghafoor defends item song in kaaf kangana mppg