पाकिस्तानात सध्या पुराने कहर केला आहे. पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. पुरामुळे पाकिस्तानातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत तिथले स्टार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत आणि इतरांनाही मदत करण्याची विनंती करत आहेत. अशात आता पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर निशाणा साधत खंत व्यक्त केली आहे.

मेहविश हयातच्या मते पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचे बरेच चाहते आहेत आणि पूरस्थितीत बॉलिवूड कलाकारांचा त्यांना पाठिंबा न मिळाल्याने ती निराश आहे. सध्या वितळलेल्या हिमनद्या आणि मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात पुराने कहर केला आहे. या पुरामुळे आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे, मात्र बॉलिवूड कलाकारांनी यावर कोणातीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा मदतीसाठी हात पुढे केलेला नाही यावर मेहविशने नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा- विल स्मिथच्या वागण्यावर क्रिस रॉकने लगावला टोला, म्हणाला “त्याने माझ्या आयुष्यातल्या…”

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

मेहविश हयातने एक ट्वीट रिव्टीट करताना लिहिलं, ‘बॉलिवूड कलाकारांचं मौन माझ्यासाठी धक्कादायक आहे. माणुसकी कोणतंही राष्ट्रीयत्व, रंग आणि धर्म याची बांधिल नसते. माणुसकीला अशा कोणत्याच मर्यादा नसतात. राजकारण बाजूला ठेवून पाकिस्तानातील चाहत्यांची काळजी करण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दुःखातून जात आहोत आणि अशा परिस्थितीत तुमचे एक-दोन शब्दही आमच्यासाठी खूप आहेत.

आणखी वाचा-आलिया- रणबीरने केली पाकिस्तानच्या पूरग्रस्तांना मदत? काय आहे व्हायरल ट्वीटमागचं सत्य

मेहविश हयातबद्दल बोलायचे झाले तर ती पाकिस्तानच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिच्या अभिनयासह तिच्या लूकमुळेही ती चर्चेत असते. त्याचबरोबर आता बॉलिवूडकरांवर निशाणा साधल्याने ती पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. दरम्यान मेहविश व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल बेला हदीदनेही पाकिस्तानमधील पुरासाठी एक व्हिडिओ शेअर करून लोकांकडे मदतीची मागणी केली होती.