शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात क्रेझ पहायला मिळत आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील लोकांनाही या चित्रपटाने वेड लावलं आहे. पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या चित्रपटाली चलेया गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? ‘या’ व्यक्तीने सुचवलं होतं नाव




पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरही शाहरुखची खूप मोठी चाहती आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये ती शाहरुखच्या जवान चित्रपटातील चलेया गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हानियाने कॅप्शनमध्ये फक्त ‘गंदा’ असे लिहिले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हानिया शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. याआधीही अनेकवेळा तिने शाहरुख खानच्या गाण्यांवर डान्स केला आहे. जवान चित्रपटाबाबत लोकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांनी या चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉग्सवर रील्सही बनवले आहेत.
हेही वाचा- “आम्ही पालक बनणार”; मिर्झापूर फेम विक्रांत मेस्सीने दिली गोड बातमी; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
जवानच्या कमाईबद्दल बोलायचे तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत तसेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. जगभरात या चित्रपटाने ९५३ कोटींची कमाई केली आहे. कमाईचा वेग पाहता लवकरच हा चित्रपट १ हजार कोटींचा आकडा पार करणार असल्याचे दिसून येते आहे.