scorecardresearch

“आज शेजारी टीव्ही फुटत आहेत,” भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

भारतीय टीमला ट्रोल करायला गेलेली पाकिस्तानी अभिनेत्री स्वतःच झाली ट्रोल, निमित्त ठरली तिने शेअर केलेली पोस्ट

Pakistani Actress Sehar Shinwari trolled for post against team india
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (फोटो – एक्सवरून साभार)

भारतीय संघाचा क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय चाहते निराश झाले, पण ते आपल्या संघाच्या पाठिशी उभे राहिले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती, पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी अभिनेत्रीने एक पोस्ट केली, पण नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं.

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने एका युजरची पोस्ट शेअर करत “आज शेजाऱ्यांच्या देशात टीव्ही फुटत आहेत,” असं कॅप्शन दिलं. तिने विशाल कुमार नावाच्या युजरची पोस्ट शेअर केली. त्यात फुटलेल्या टीव्हीचा फोटो आणि भारतीय टीमला कधीच सपोर्ट करणार नाही आणि यापुढे कधीच क्रिकेट बघणार नाही, असं लिहिलं होतं. पण तिच्या याच पोस्टवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

hardeep singh nijjar photoes canada gurudwar
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे सूत्रधार कोण?
union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य
rahul-dholakia
“पाकिस्तानी कलाकारांनाही…” शाहरुख खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकीया यांचं ट्वीट चर्चेत
UP ATS arrests former contract Army employee
ISI ला २ हजार रुपयांसाठी विकली भारतीय लष्कराची माहिती, पाकिस्तानी तरुणीशी फोनवर अश्लील गप्पा मारणाऱ्या तरुणाला ATS ने केली अटक

सेहर शिनवारीने ज्या युजरची पोस्ट शेअर केली आहे, तेच फेक अकाउंट होतं. त्याच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट टाकत एक युजर म्हणाला, ‘मला वाटतं की हा पाकिस्तानमधील सीन आहे, जेव्हा ते अफगाणिस्तानविरुद्ध हरले होते.’ ‘अशिक्षित बाई ते अकाउंट पाकिस्तानचंच आहे, स्वतःचा अपमान करून घेण्यात आनंद वाटतोय का,’ अशा कमेंट युजर्स करत आहेत.

Sehar Shinwari Troll
सेहर शिनवारी ट्रोल

दरम्यान, विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या टीमने ४ गडी गमावत ४३ षटकात पूर्ण केलं आणि सहाव्यांदा वनडे वर्ल्ड चॅम्पियन झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistani actress sehar shinwari trolled for post against team india from fake account hrc

First published on: 20-11-2023 at 16:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×