अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’वर पाकिस्तानी अभिनेत्रीची टीका, म्हणाली…

अभिनेत्रीन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटावर निशाणा साधला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात आणि जिबरान नासिरने चित्रपटावर इस्लामोफोबियाचा आरोप केला होता.

‘सूर्यवंशी’चा निर्माता रोहित शेट्टीने चित्रपटातील इस्लामोफोबियावर प्रतिक्रिया दिली आहे. पण आता मेहविशने केलेले ट्वीट चर्चेत आहे. ‘बॉलिवूडमधील नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट सूर्यवंशीमध्ये इस्लामोफोबिया पाहायला मिळाला. हॉलिवूडमध्ये अनेक गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे सीमेवरही असे काही पाहायला मिळेल. मी आधीही म्हटले होते की तुम्ही सकारात्मक दाखवू शकत नाही तर कमीत कमी मुस्लिमांची भूमिका योग्य पद्धतीने दाखवा. शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा’ या आशयाचे ट्वीट मेहविशने केले आहे.
आणखी वाचा : ‘ब्रा’च्या रंगामुळे चर्चेत आलेल्या पाकिस्तानी अभिनेत्रीचं दाऊद कनेक्शन माहितीये का?

सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. मात्र करोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistani famous actress mehwish hayat talks about akshay kumar film suryavanshi avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या