दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याचं कॉपी वर्जन आहे असं म्हणत पाकिस्तानी गायक अबरार उल हकने याबाबत एक ट्विट करत करणवर आरोप केले होते. पण टी-सीरिजनेच आता ट्विट करत या पाकिस्तानी गायकाची बोलती बंद केली आहे. तसेच करणवर केलेले आरोप देखील खोटे असल्याचं यामधून सिद्ध झालं आहे.

टी-सीरिजने नेमकं काय ट्विट केलं?
टी-सीरिजने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “१ जानेवारी २००२मध्ये आयट्यून्सवर प्रदर्शित झालेल्या ‘नच पंजाबन’ या अल्बममधील नच पंजाबन या गाण्याचे अधिकृत हक्क आम्ही खरेदी केले. हे गाणं लॉलीवूड क्लासिक्स (Lollywood Classics) या युट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहे. मुव्हीबॉक्स रेकॉर्डस् लेबलकडे या गाण्याचे सर्व अधिकार आहेत. जेव्हा हे गाणं प्रदर्शित केलं जाईल तेव्हा सगळ्या प्लॅटफॉर्मला याचं क्रेडिट देखील दिलं जाईल. ज्या गाण्यावर सध्या बोललं जात आहे त्या गाण्याचे कॉपीराइट्सचे अधिकार मुव्हीबॉक्सकडे आहेत.”

आणखी वाचा – “योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत

टी-सीरिजने ट्विटमधून आपला मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडला आहे. “मी माझं गाणं नाच पंजाबन कोणत्याच भारतीय चित्रपटाला विकलं नाही. या गाण्याचे राईट्स देखील माझ्याकडे आहेत. जेणेकरून नुकसान भरपाईसाठी मी कोर्टामध्ये धाव घेईन. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी तरी गाणं कॉपी करु नये. हे माझं सहावं गाणं आहे जे कॉपी करण्यात आलं आहे.” असं ट्विट पाकिस्तानी गायक अबरार उल हकने केलं होतं. पण आता त्याचा याबाबत प्रत्युत्तर मिळालं आहे.