दिग्दर्शक करण जोहरचा आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही तासांमध्येच हा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला. कियारा अडवाणी आणि वरुन धवनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करणसमोर या चित्रपटामधील गाण्यामुळे नवीन अडचण निर्माण झाली आहे. चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं कॉपी केल्याचा आरोप करणवर होत आहे.


‘जुग जुग जियो’ चित्रपट अडचणीत
‘जुग जुग जियो’मधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याचं कॉपी वर्जन आहे. पाकिस्तानी गायक अबरार उल हकने याबाबत एक ट्विट करत करणवर आरोप केले आहेत. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी माझं गाणं नाच पंजाबन कोणत्याच भारतीय चित्रपटाला विकलं नाही. या गाण्याचे राईट्स देखील माझ्याकडे आहेत. जेणेकरून नुकसान भरपाईसाठी मी कोर्टामध्ये धाव घेईन. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी तरी गाणं कॉपी करु नये. हे माझं सहावं गाणं आहे जे कॉपी करण्यात आलं आहे.”

आणखी वाचा – “पुष्पा, आरआरआर चित्रपट सुपरहिट ठरले आणि…”, बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर स्पष्टच बोलला करण जोहर

संतापलेल्या पाकिस्तानी गायकाने लगेचच यानंतर दुसरं ट्विट केलं. “नाच पंजाबन गाणं कॉपी करण्याचा अधिकार मी कोणालाच दिला नाही. जर कोणाकडे तशी अधिकृत कागदपत्र असतील तर ती त्यांनी माझ्यासमोर सादर करावीत. अन्यथा मला त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल.” असं पाकिस्तानी गायक अबरार उल हकने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – सलमानच्या सांगण्यावरुन संजय लीला भन्साळींना भेटली कंगना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “तू तर…”

आणखी वाचा – Loksatta Exclusive : “कलाकारांपेक्षा घोड्याचा खर्च अधिक कारण…” प्रविण तरडेंनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा

अबरार गायक, गीतकार आणि राजकारणी देखील आहे. किंग ऑफ पाकिस्तानी पॉप म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. अबरारने करण विरोधात ट्विट करत धर्मा प्रॉडक्शन आणि करणला त्यामध्ये टॅग केलं आहे. अबरारचं हे ट्विट पाहता नेटकऱ्यांनी देखील करणला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता करण यावर काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.