'द लीजेंड ऑफ मौला जट्ट'नंतर आता 'या' पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध | pakistani webseries seval the confessiona trailer controversy on social media | Loksatta

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध

नुकताच या सीरिजचा पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध
पाकिस्तानी वेबसीरिज (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जगभरात बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होत आहे, दिग्दर्शक राजामौली यांचा ‘RRR’ चित्रपटाची हवा जगभरात आहे. ज्याप्रमाणे भारतातील चित्रपटांची हवा आहे त्याचपद्धतीने आता पाकिस्तानी चित्रपटांची चर्चा जगभरात होत आहे. असाच एक पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमसच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खानचे आज भारतात ही चाहते आहेत. त्याच्या ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात या १० मिलियन डॉलर्स इतकी कमाई केली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी हा भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सध्या प्रचंड वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानशी भारताचे संबंध तितके चांगले नसल्याने हा वाद निर्माण झाला आहे. बऱ्याच राजकीय पक्षांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. महाराष्ट्रातदेखील या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. शिवाय अभिनेता रणबीर कपूर आणि इतर बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटाला पाठिंबा दिल्याने येणाऱ्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चित्रपटापाठोपाठ आणखी एक पाकिस्तानी वेबसीरिजचीही सध्या चर्चा होत आहे.

आणखी वाचा : ‘RRR’, ‘KGF2’वर भारी पडणार ‘हा’ पाकिस्तानी चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ला देणार टक्कर?

‘सेवक – द कनफेशन’ नावाची एक पाकिस्तानी वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तानमधीलही काही हिंदू संघटनांनी या वेबसीरिजचा विरोध दर्शवला आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यामध्ये १९८४ च्या दंगली, गुजरात दंगल आणि अयोध्याची घटनासुद्धा दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमधून हिंदू संत तसेच भारतीय संघटना यांचं नकारात्मक चित्रण यातून पाहायला मिळत आहे. नुकताच या सीरिजचा पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या या वेबसीरिजला जबरदस्त विरोध होताना दिसत आहे.

२०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली. आजतागायत ही बंदी सुरु आहे. तरी फवाद खानचा चित्रपट असो किंवा ही सीरिज यामुळे पुन्हा एकदा भारतातील आणि खासकरून मनोरंजन विश्वातील वातावरण गढूळ होण्याची शक्यता अधिक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 08:50 IST
Next Story
‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री