झी युवावरील ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमध्ये सध्या बरीच मजा सुरू आहे. आधी राघव बाबाचे फंडे, नंतर ख्रिसमस पार्टी, त्यात सुमितने सौम्याला केलेले प्रपोज, नंतर त्यांच्यात दरवाजाच्या कडीवरून झालेला गैरसमज आणि त्यानंतर शिक्षा मिळालेला आणि आता काहीसा सुधारलेला राघव अशा बऱ्याच घटनांनी सध्या ही मालिका तरुणाईमध्ये दिवसेंदिवस चांगलीच लोकप्रिय होत आहे. एवढे सगळे गोंधळ सुरु असताना एक नवीनच पण सुंदर ट्विस्ट ‘लव्ह लग्न लोचा’च्या मालिकेत आले आहे.
[jwplayer u6NQStwU]
लग्नमंडपातून पळून आलेली एक सुंदर मुलगी, जिचे राघववर अतोनात प्रेम आहे आणि तिला राघवशीच लग्न करायचे आहे. हो म्हणजे आता कुठे राघव थोडासा सुधारत होता पण त्याचा भूतकाळ काही त्याला सुधारू देईल असे वाटत नाही. अभिनेत्री पल्लवी पाटील ही रुचा या राघवच्या पुर्वाश्रमीच्या प्रियसीच्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येत आहे. राघव आणि रुचाचे आधी प्रेम प्रकरण होते. म्हणजे राघवने रुचाला कधीकाळी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. पण जस जसा वेळ गेला तसे राघव हे विसरुनही गेला होता. पण आता जेव्हा राघवने थोडेसे सुधारण्याचे मनावर घेतले अगदी तेव्हाच रुचाचे त्याच्या आयुष्यात पदार्पण झाले. तिने या मालिकेत फक्त पदार्पणच केले नाही तर ती लग्नाच्या मंडपातून केवळ आणि केवळ राघवच्या प्रेमाखातर पळून आली आहे. तिला फक्त आणि फक्त राघवशीच लग्न करायचे आहे.
मालिकेचा हा ट्रॅक सध्या एका हटके मोड वर आला आहे. सुधारलेला राघव, चांगुलपणामुळे आता रूचाशी लग्न करायला तयार झालाय खरा पण घरातले सगळेच या गोष्टीच्या विरोधात आहेत. या विरोधासाठी सगळेच स्वतःची कंबर कसत आहेत . राघवने रुचाशी लग्न करू नये यासाठी आता नेहमीच राघवाच्या विरोधात असलेली काव्या आणि अभिमानाची बायको शाल्मली या दोघीनांही राघवशी लग्न करायचे आहे. आता हे काय गौडबंगाल आहे आणि राघव आता नक्की कोणाबरोबर लग्न करणार हे पाहण्यासाठी बघत राहा ‘लव्ह लग्न लोचा’ रोज रात्री ८:३० वाजता फक्त झी युवावर.
[jwplayer 6EsZGGfh]