scorecardresearch

Video: अलाना पांडेच्या लग्नात भटजीने नवरदेव आयव्हरचं नाव चुकवलं; नवीन नाव ऐकून उपस्थितांना हसू अनावर

अलानाच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लग्नात भटजीने नवरदेवाचं नाव चुकीचं घेतल्याचं ऐकू येतं.

alanna-panday-wedding
(फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलानाने फोटोग्राफवर व व्हिडीओग्राफर असलेल्या आयव्हरशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लग्नात भटजीने नवरदेवाचं नाव चुकीचं घेतल्याचं ऐकू येतं.

वयाच्या चौथ्या वर्षापासून मोलकरणीने केला शारीरिक छळ; ‘मै नही तो कौन बे’ फेम सृष्टी तावडेचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मी माझ्या पालकांना…”

‘वेडिंग डिझायनर्स द ए-क्यूब प्रोजेक्ट’ने इंस्टाग्रामवर अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, भटजी “आपण इथे अलाना आणि इंदरच्या लग्नासाठी जमलो आहोत” असे म्हणत लग्नाच्या विधी सुरू करतात. त्यांनी आयव्हरला इंदर म्हणताच पाहुणे आणि नवरदेव-नवरी देखील हसू लागतात. त्यावर अलानाची आई त्यांना आयव्हर असं नाव सांगतात आणि मग ते नाव घेत लग्नाचे विधी पूर्ण केले जातात.

अलाना पांडे ही चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. ती एक मॉडेल व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तर, आयव्हर हा फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर आहे. आयव्हर आणि अलाना बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, दोघांनी २०२१ मध्ये एंगेजमेंट केली होती. त्यानंतर आता त्यांनी मुंबईमध्ये लग्न केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 14:37 IST

संबंधित बातम्या