‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. विनोदाचे बादशाह, हुकमी एक्के अशी या दोघांची ओळख आहे. या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील गाण्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दादा परत या ना हसवा ना… हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यानंतर कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुशल बद्रिकेने काल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यावर त्याने म्हटले, “मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी गाण असाव वाजवायला ज्यात मी आहे. असं मला कायम वाटायचं, असं एक जबरी गाण दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक्यू. मित्रांनो गाण नक्की बघा,” असं म्हणत कुशलने गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे गाणे अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केलं असून आहे. तर आदर्श शिंदे यांनी ते गायलं आहे. येत्या 3 डिसेंबरला “पांडू” चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील गाजलेली ही व्यक्तिरेखा भाऊंनी साकारली आहे. ‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची.या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : ‘देवमाणूस २’मध्ये किरण गायकवाड दिसणार नाही?

अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. ‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandu marathi movie actor kushal badrike instagram post viral nrp
First published on: 02-12-2021 at 12:43 IST