scorecardresearch

सिद्धू मूसेवालानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाजवर हल्ला, हनी सिंगने दिली त्याच्या प्रकृतीची माहिती

अल्फाजवर मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिद्धू मूसेवालानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाजवर हल्ला, हनी सिंगने दिली त्याच्या प्रकृतीची माहिती

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. या घटनेला काहीच महिने पूर्ण झालेत, तर आता पंजाबी गायक अल्फाज याच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे. अल्फाजवर झालेल्या हल्लाची बातमी ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसला आहे. अल्फाजवर मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध पंजाबी गायक हनी सिंगने त्याच्या प्राकृतिविषयी माहिती आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची ग्रेट भेट, ‘या’ विषयांवर केली चर्चा

हनी सिंगने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अल्फाजच्या प्राकृतिबद्दल माहिती दिली आहे. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी आत्ताच अल्फाजला हॉस्पिटलमध्ये बघायला आलो. त्याची प्रकृती गांभीर असून तो आयसीयूमध्ये आहे. कृपाय तो लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सगळे प्रार्थना करा.”

रिपोर्टनुसार, अल्फाज शनिवारी रात्री मित्रांबरोबर एका ढाब्यावर गेला होता. त्यावेळी त्या ढाब्यावर काम करणारा माजी कर्मचारी विकी आणि ढाब्याचा मालक यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी विकीने अल्फाजला या प्रकरणात मध्यस्थी करण्यास सांगितले. पण ढाब्याच्या मालकाने त्याचे पैसे देण्यास नकार दिला. पुढे त्यांच्यात मोठा वाद झाला.

हेही वाचा : प्रसिद्ध रॅपर हनी सिंग आणि पत्नी शालिनीचा घटस्फोट; गायकाने पोटगी म्हणून दिली ‘इतकी’ रक्कम

आरोपीने त्या ढाबा मालकाचा ट्रक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्स घेताना त्याने अल्फाजला ट्रकने उडवले. विकीविरोधात ३ ऑक्टोबर रोजी मोहालीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या