अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. गँग्स ऑफ वासेपुर ते मिर्झापूर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सध्या पंकज त्रिपाठी हे सिनेसृष्टीपासून दूर आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना दुसऱ्या भाषेतील चित्रपटात काम करणे का आवडत नाही? याबाबतही त्यांनी खुलासा केला आहे.

पीटीआयने नुकतंच पंकज त्रिपाठी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तो म्हणाला, “जर मी माझ्या आवाजाचा योग्य वापर करु शकलो नाही तर दुसऱ्या भाषेत बोलताना मी त्या पात्राला न्याय देऊ शकणार नाही. मला डबिंग हा प्रकार अजिबात आवडत नाही. पण इतर भाषेतील चित्रपटात एखादी हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा असेल तर ती करायला मला नक्कीच आवडेल.”

कोणतं शहर पटकावणार ११ लाखांच्या पैठणीचा मान? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

“जी भाषा मला स्वत:ला सोयीस्कर वाटत नाही, त्या चित्रपट किंवा वेबसीरिजमध्ये मला बोलणे अजिबात आवडत नाही. माझा संवाद दुसरं कुणीतरी बोलतोय हे मला कधीच चालणार नाही. माझ्या अभिनयाचे आणि हावभावाचे सौंदर्य हे माझ्या आवाजात आहे. अन्यथा माझी भूमिका अपूर्ण आहे असे मला वाटतं”, असेही त्याने सांगितले.

पत्नी तृप्तीपासून घटस्फोट घेण्यावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण, म्हणाला “आम्ही…”

‘तुम्ही भविष्यात कधी बंगाली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तो तुम्हाला समजला तर तुम्ही त्यात काम कराल का?’ असा प्रश्न यावेळी पंकज त्रिपाठीला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला त्या भाषेबद्दल फार कमी माहिती आहे. मला ती समजते. पण मला ती भाषा बोलता येत नाही. त्यामुळे एखादे बंगाली पात्र पडद्यावर साकारण्यासाठी ती माहिती पुरेशी नाही.” दरम्यान पंकज त्रिपाठी हा लवकरच ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’ या चित्रपटात झळकणार आहेत.