शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हंगामा २’चा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २३ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

shilpa shetty, Paresh rawal, hungama 2, hungama 2 trailer,
हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटाचा सीक्वल आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘हंगामा २’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटाचा सीक्वल आहे. येत्या २३ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘हंगामा’ चित्रपटाप्रमाणेच ‘हंगामा २’मध्ये देखील परेव रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक मुलगी लहान बाळा घेऊन बसलेली दिसत आहे. हे बाळ मिजानचे असल्याचे ती म्हणत असते. दरम्यान मिजान आणि शिल्पा खरे शोधत असतात. पण मिजान आणि शिल्पाचे एकत्र फिरणे पाहून परेश रावल यांना पत्नी शिल्पा शेट्टीचे अफेअर सुरु आहे असे वाटते. त्यामुळे ‘हंगामा १’ प्रमाणेच ‘हंगामा २’मध्येही परेश रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार. हे सर्व पाहून प्रेक्षकांना हसू अनावर होईल.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबिताच्या ‘रँप वॉकवर’ चाहते फिदा

‘हंगामा २’ या चित्रपटात शिल्पा आणि परेश रावल यांच्यासोबत राजपाल यादव, मिजान जाफरी, प्रणिता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले आहे. हा चित्रपट २३ जुलै रोजी डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने कमबॅक केला आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती.

२००३मध्ये प्रदर्शित झालेला ‘हंगामा’ हा चित्रपट बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. आजही प्रेक्षक तो चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटात परेश रावल, सोमा आनंद, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि अफताब शिवदसानी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paresh rawal and shilpa shetty starrer hungama 2 trailer out avb