बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच परिणीतीने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिले. यावेळी तिने सिनेसृष्टीतील कलाकारांपासून तिची बहिण अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याविषयी उघडपणे भाष्य केले.

परिणीती ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या परिणीती ही हनुरबाज या शोचे परिक्षण करताना दिसत आहे. नुकतंच परिणीतीने ‘AskMeAnything’ द्वारे तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांपासून सर्व गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी तिला एका चाहत्याने विचारले की, ‘पिझ्झाच्या टॉपिंगमध्ये तुला सर्वात जास्त काय आवडते?’ त्यावर परिणीतीने ‘हिरव्या मिरच्या’ असे उत्तर देत ‘आपण न्याय करू शकत नाही’, असे तिने म्हटले.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

यादरम्यान एका चाहत्याने परिणीतीला प्रियांका चोप्राबद्दल प्रश्न विचारला. ‘तुला प्रियांका चोप्राबद्दल सर्वात जास्त काय आवडते?’ असा प्रश्न चाहत्याने तिला विचारला. त्यावर परिणीती म्हणाली की, “ती जगासाठी स्टार आहे. पण माझ्यासाठी ती खरी मोठी बहीण आहे. माझ्या सर्व भावंडांमध्येही मी सर्वात मोठी आहे. पण ती माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ‘मोठी बहीण’ आहे.”

यावेळी तिला करण जोहरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावर ती म्हणाली की, “तो माझे चांगले करणार आहे, तो माझ्यासाठी नवरा शोधणार आहे.” यानंतर तिला अर्जुन कपूरबद्दल प्रश्न विचारला असता परिणीती म्हणाली की, “त्याच्याबद्दल काही ओळी फार होतील. तुझा आवाज ऐकण्यालायक नाही. तुम्ही कमी बोलाल तर चांगलं होईल आणि मी तुमचा नंबर डिलीट केला, तरच बरं होईल”, असे तिने यावेळी म्हटले.

“एखादा पुरस्कार तर सोडा…”, उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ चित्रपटाबाबत व्यक्त केली खंत

परिणीती आणि अर्जुनने ‘इश्कजादे’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांची टिंगल करताना दिसतात. परिणीती नुकतीच अर्जुनसोबत ‘संदीप और पिंकी फरार’मध्ये दिसली होती. या चित्रपटात परिणीतीने बँकरची भूमिका साकारली होती, तर अर्जुन पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता.