मोनोकनीमधील परिणीती चोप्राचा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने पिवळ्या रंगाची मोनकनी परिधान केल्याचं दिसतंय. तर

parineeti-chopra
(Photo-Instagram@parineetichopra)

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. परिणीती तिच्या मालदीव व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहे. परिणीतीने लाल रंगाच्या बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केल्यानंतर आता तिने मोनोकनीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. परिणीतीच्या या व्हिडीओला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने पिवळ्या रंगाची मोनकनी परिधान केल्याचं दिसतंय. तर स्विमिंग पुलमध्ये ती निवांत क्षणांचा आनंद लुटताना दिसतेय. ‘शांती’ असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. परिणीतीने हा व्हिडीओ शेअर करताच तो चांगलाच व्हायरल होवू लागला आहे.

परिणीती चोप्राने शेअर केला बिकिनीतील बोल्ड फोटो; प्रियांका चोप्राने दिली ‘ही’ कमेंट

नागा चैतन्यबद्दल ही गोष्ट समजल्याने आमिर खानसमोरच नागार्जुन झाले भावूक; ‘हे’ आहे कारण

परिणीतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. कुणी तिला जलपरी म्हंटंल आहे. तर कुणी मासा. अनेक नेटकऱ्यांनी फायरचे इमेजी देत व्हिडीओला पसंती दिली. या आधी परिणीतीने लाल रंगाच्या बिकिनीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर प्रियांका चोप्राने केलेल्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांकाने कमेंट करत म्हंटलं, ” अह्… कदाचित इंस्पायर्ड आहे वाटतं?” तर यावर परिणीतीने देखील प्रियांकाला उत्तर दिलं आहे. “कदाचित नाही, नक्कीच!” असं म्हणत परिणीतीने प्रियांकमुळे प्रभावित होत पोस्ट शेअर केल्याचं मान्य केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parineeti chopra share video from maldives in bold yellow monokini goes viral kpw

ताज्या बातम्या