नव्या चित्रपटातून परिणीतीचं चाहत्यांना सरप्राईझ

अभिनेत्रीच्या भूमिकेसोबतच एका नव्या भूमिकेतही दिसणार

प्रत्येक कलाकार हा सतत आपल्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत असतो. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी चित्रपटात अभिनयासोबत गाणंही म्हटलं आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपल्या एका चित्रपटात गाणं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे.

परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं गाणं सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतंय. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. तिनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. “मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मला गाणं गायची संधी मिळाली”, असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं आहे.

परिणीतीने हे गाणं आपल्या भूमिकेचा विचार पुरेपूर विचार करून गायलंय हे गाण्यातून स्पष्टपणे कळत आहे. पात्राची असहाय्यता परिणीतीने गाण्यातही उतरवली आहे.

या चित्रपटात परिणीती स्मरणशक्ती हरवलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या रहस्यमय आणि रोमांचक कथा असलेला हा चित्रपट आज नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत अभिनेत्री आदिती राव हैदरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parineeti chopra sings a song in the girl on the train new movie vsk