scorecardresearch

“कमाईचे उच्चांक मोडणाऱ्या पठाणसाठी Sad News ! ” कोमल नहाटा कारण सांगत म्हणाले..

कोमल नहाटा यांनी एक ट्विट करून नेमकी ही सॅड न्यूज काय आहे ते सांगितलं आहे

Pathaan Movie Poster What Komal Nahata Said?
कोमल नहाटा यांनी काय म्हटलं आहे?

अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा २५ जानेवारीला थिएटर्स मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर रोज पठाण हा सिनेमा कमाईचे उच्चांक मोडतो आहे. रोज पठाणसाठी एक तरी चांगली बातमी येतेच. शाहरुख खानचा स्पाय थ्रीलर असेलाला हा सिनेमा प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत होता. बेशरम रंग गाण्यातल्या भगव्या बिकिनीचा वाद झाल्यावर तर अनेकांना वाटलं की सिनेमा पडणार. पण घडलं वेगळंच. शाहरुखचा हा सिनेमा चांगलाच चालू लागला. १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी असे कमाई असे कमाईचे उच्चांक रोज मोडत आहेत. रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या पठाणसाठी सॅड न्यूज आली आहे असं सिने समीक्षक कोम नहाटा म्हणत आहेत.

काय म्हटलं आहे कोमल नहाटा यांनी?

Sad news about ‘Pathaan’. Hope correction happens soon. असं एका ओळीचं ट्विट कोमल नहाटा यांनी केलं आहे. त्यानंतर या ओळीसोबत काही व्हिडिओही त्यांनी ट्विट केले आहेत. या व्हिडिओंमध्ये पठाणला झालेली गर्दी आणि त्यानंतर कोमल नहाटा म्हणत असलेली सॅड न्यूज असं दोन्हीही दिसून येतं आहे. पठाण प्रदर्शित झाल्यापासून कमाई करतो आहे. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी ही कमाई घटेल असं वाटलं होतं. मात्र सिनेमा कमाईचे उच्चांक मोडतोच आहे. मात्र हे सगळं चांगलं असताना एक वाईट गोष्टही घटते आहे असं कोमल नहाटांनी म्हटलं आहे.

बेशरम रंंग गाण्यातला प्रसंग

काय आहे पठाणसाठीची Sad News?

अमरावती, धुळे, मालेगाव, नाशिक, रायपूर आणि बिलासपूर या ठिकाणी असलेल्या चित्रपटगृहांमध्ये लोकच लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचं काम एका अर्थाने करत आहेत. कुणी असं कशाला करेल? असा प्रश्न विचारला जाऊ शकतोच. पण या सिनेमाला जाणारी लोकांची गर्दीच हे करते आहे. सिनेमात बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी सुरू झाली की लोक मोठ्या प्रमाणावर नाचू लागतात. सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगाच्या वेळी तर अनेक लोक सिनेमाच्या पडद्याजवळ येऊन नाचू लागतात. यामुळे खुर्च्यांचे नुकसान, सिनेमाच्या पडद्यांचं नुकसान होतं आहे. लोक इतक्या अतिउत्साहात आहेत की पठाण सिनेमाचा शो सुरू असताना त्यांनी फटाकेही वाजवले. अशा घटना थांबल्या नाहीतर सिनेमागृहात आग लागण्याचीही शक्यता आहे. एखाद्या सिनेमागृहात आग लागली आणि धक्काबुक्की झाली तर किती लोकांचा बळी जाईल याचा विचार करा! असं म्हणत पठाण सिनेमा चालत असला तरी त्यासोबत ही वाईट बातमीही येते आहे असं कोमल नहाटा यांनी म्हटलं आहे.

झुमे जो पठाण गाण्यातला प्रसंग

कोमल नहाटा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओंमध्ये काय?

कोमल नहाटा यांनी जे व्हिडिओ ट्विट केले आहेत त्या व्हिडिओजमध्ये लोकं पठाण सिनेमा पाहात असताना गाणं लागलं की अचानक उभे राहून नाचू लागतात हे दिसतं आहे. त्यांच्या प्रभावामुळे इतर लोकंही नाचू लागतात. बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी लागली की लोकं उठून नाचू लागतात हे या तिन्ही व्हिडिओजमध्ये दिसतं आहे. काही ठिकाणी खुर्च्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात एखादी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली पाहिजे. असंही कोमल नहाटा यांनी म्हटलं आहे.

३०-३५ टक्के कमी बुकिंग

सिनेमागृहांमध्ये असे प्रकार घडू लागल्याने थिएटर मालक अनेक ठिकाणी ३० ते ३५ टक्के बुकिंग कमी करत आहेत. त्यामुळे एका अर्थाने हे पठाणचे नुकसान होतं आहे असंही कोमल नहाटा यांनी म्हटलं आहे. बुकिंग कमी केल्याने प्रेक्षकांचं थिएटरमध्ये जाण्याचं प्रमाण कमी होतं मग त्यांनी गाणं सुरू झाल्यानंतर गर्दी केली आणि नाच केला तर त्यांना गर्दी नियंत्रित करणं सोपं जातं असं थिएटर मालकांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:08 IST